Join us

IN PICS : सेलिब्रिटींचे नखरे..., फक्त याच अटीवर सिनेमा साईन करतात हे बडे कलाकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 2:20 PM

1 / 10
बॉलिवूडचा ‘दबंग खान’म्हणून ओळखला जाणारा सलमान खान केवळ एकाच अटीवर सिनेमा साईन करतो. ती म्हणजे ‘नो किसिंग पॉलिसी’. कितीही करोड दिले तरी चित्रपटात किसिंग सीन्स द्यायला भाईजानचा नकार असतो. याशिवाय शूटच्या ठिकाणी त्याला पर्सनल जिम हवी असते. रात्री बेरात्री कधीही सल्लू भाई जिममध्ये व्यायाम करतो.
2 / 10
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार फक्त एकाच अटीवर सिनेमा साईन करतो. ती म्हणजे, संडे इज अ हॉलिडे. होय, रविवारी मी काम करणार नाही, असं तो सिनेमा साईन करण्याआधीच निर्मात्यांना सांगतो. ही अट मान्य असेल तरच पुढची बोलणी करतो. रविवारचा अख्खा दिवस तो कुटुंबाला देतो.
3 / 10
अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही अनेकदा चर्चेत येत असते. बेबोच्या तीन अटी असतात. पहिली अट म्हणजे नो किसिंग. दुसरी म्हणजे मी फक्त ए लिस्टर्स स्टारसोबतच काम करणार. आता तिने सेक्शुअल सीनदेखील करण्यास नकार दिला आहे. जो दिग्दर्शक या अटी मान्य करेल त्याच प्रोजेक्टमध्ये करीना काम करते.
4 / 10
दीपिका पादुकोण सुद्धा फक्त ए- लिस्टर्स स्टार्ससोबतच काम करणार, याच अटीवर सिनेमा साईन करते. असं म्हणतात की, केवळ तिच्या याच अटीमुळे ‘पद्मावत’ चित्रपटातून विकी कौशलची हाकालपट्टी करण्यात आली होती.
5 / 10
प्रियंका चोप्रा सुद्धा सिनेमा साईन करताना एकच अट ठेवते. ती म्हणजे, नो न्यूडिटी शॉट्स. हॉलिवूड सिनेमात स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया प्रियंका केवळ याच अटीवर सिनेमा साईन करते.
6 / 10
कंगना राणौतला चित्रपटासाठी देण्यात येणारं संपूर्ण मानधन दिल्यानंतरच दिग्दर्शक, निर्माते तो चित्रपट रिलीज करु शकतात, अशी ती अट ठेवते. जोपर्यंत कंगनाला सगळे पैसे मिळत नाही तोपर्यंत ती चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाही. याशिवाय मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. माझे मॅनेजर सगळं बघतील, असं ती स्पष्ट सांगते.
7 / 10
कतरिना कैफला प्रत्येक बाबतीत परफेक्शन लागतं. प्रत्येक शॉट अगदी परफेक्ट असावा, हा तिचा आग्रह असतो. तिला सेटवर स्वत:च्या आवडीचा फोटोग्राफर लागतो. ‘फितूर’ सिनेमाच्या वेळी तिने काही शॉट्स पुन्हा शूट करून घ्यायची वेगळीच मागणी केलेली कारण तिने वजन कमी केलं होतं.
8 / 10
अभिनेता हृतिक रोशनची एकच अट असते. ती म्हणजे त्याला प्रत्येक शूटिंगच्या जागी त्याचा वेगळा शेफ लागतो. फिटनेस फ्रिक असलेला हृतिक तब्येतीची अतिकाळजी घेतो. पौष्टिक आहारावर त्याचा भर असतो. त्यामुळे त्याची ही अट निर्मात्यांना मानावीच लागते.
9 / 10
पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सनी लिओनी आज लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये एक असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे स्वभावाने अत्यंत साधी असलेल्या सनीची अटदेखील तशीच आहे. चित्रपटाच्या सेटवर किंवा ओव्हर आॅल सगळ्यांनी तिचा योग्य तो मान ठेवावा. तसंच लिप लॉक करण्याचा निर्णयदेखील तिला ज्यावेळी योग्य वाटेल त्याचवेळी ती घेईल.
10 / 10
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, प्रत्येक चित्रपट करतांना तिची एक अट असते. ती कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन देणार नाही. जर तिची ही अट मान्य असेल तरच ती कॉन्ट्रॅक्ट साईन करते.
टॅग्स :दीपिका पादुकोणअक्षय कुमारहृतिक रोशनकरिना कपूरबॉलिवूड