Join us

"मला असं वाटलं की, मी संपलो..."; ब्रेकअपमुळे अभिनेता दुखावला, सेटवरच ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 5:00 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये त्याने चॉकलेट बॉय म्हणून इमेज तयार केली.
2 / 10
शाहिदच्या आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा तो एका व्यक्तीला डेट करत होता आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यानंतर तो खूप खचला होता.
3 / 10
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शाहिदने सांगितलं की, 'मी फक्त एकदाच रडलो आहे. तेही जेव्हा कोणीतरी माझं हृदय तोडलं.'
4 / 10
'मेकअप करणाऱ्याने माझा मेकअप केला आणि मी रडू लागलो. त्याने मला थांबवलं पण मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकलो नाही. मला असं वाटलं की, मी आता संपलो आहे.'
5 / 10
'मी कामावरून कधी रडलो नाही. पण हो, माझं हृदय तुटल्यावर मी खूप रडलो आहे. समाजात असं दिसून आलं आहे की. पुरुषांकडून लोकांच्या अपेक्षा असतात.'
6 / 10
'लहान वयातच आपल्याला शिकवलं जातं की, आपलं एक कुटुंब आहे आणि ते आपण जपलं पाहिजे. जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा मला वाटलं आता समाजात माझ्याबद्दल काय म्हटलं जाईल.'
7 / 10
'पण मी स्वतःवर दडपण आणायला नको होतं. मी स्वतःला समजावून सांगायला हवं होतं. त्यावेळी मी स्वतःला थोडं रिलॅक्स करायला हवं होतं आणि अनावश्यक गोष्टींचा विचार करायला नको होता.'
8 / 10
शाहिद कपूरने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत.
9 / 10
अभिनेता सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतो. त्याने मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. त्याला दोन गोंडस मुलं देखील आहेत.
10 / 10
टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूड