Join us  

'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:47 PM

1 / 7
'कुछ कुछ होता है' सिनेमा कोणाला माहित नाही असा माणूस सापडणार नाही. या सिनेमात शाहरुख खानची मुलगी अंजलीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं
2 / 7
'कुछ कुछ होता है' गाजलाच. शाहरुख-काजोल-सलमान खानचंही कौतुक झालं. परंतु आजही सिनेमातील छोट्या अंजलीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराला लोक विसरले नाहीत
3 / 7
अंजली खन्ना ही भूमिका साकारलीय अभिनेत्री सना सईदने. सना आता मोठी झाली असून ती २२ सप्टेंबरला तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे
4 / 7
सना सईद सोशल मीडियावर तिचे बोल्ड अन् ब्यूटिफूल अंदाजातले फोटोशूट पोस्ट करत असते. लहानपणीची सना आता दिसायला खूपच वेगळी दिसतेय
5 / 7
'कुछ कुछ होता है' नंतर बादल आणि हर दिल जो प्यार करेगा या हिंदी सिनेमांमध्येही बालकलाकार म्हणून सना झळकली. सनाला चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली
6 / 7
सनाने काही वर्षांचा ब्रेक घेऊन मोठं झाल्यावर स्टूडंड ऑफ द इयर सिनेमात काम केलेलं. सनाचं बदललेलं रुप पाहून हीच छोटी अंजली आहे हे कोणी तिला ओळखू शकलं नाही
7 / 7
सना सध्या अभिनय क्षेत्रातून गायब असून ती तिच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. सनाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलंय
टॅग्स :सना सईदबॉलिवूड