PICS : शमिता शेट्टी व राकेश बापटचा व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर साखरपुडा? अलिबागला होणार फंक्शन? By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 5:01 PM1 / 7बॉलिवूडचं आणखी एक कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. होय, हे कपल म्हणजे शमिता शेट्टी व राकेश बापट.2 / 7उद्या व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर दोघं साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. कारण आहेत, दोघांचे फोटो.3 / 7होय, शमिता व राकेश अलीकडे मुंबईतील एका ज्वेलरी स्टोअरबाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अशात शमिता राकेश हे दोघं शेट्टी कुटुंबासह अलिबागला रवाना झालेत.4 / 7 अलिबागला रवाना होत असतानाचे शमिता व राकेशचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोत शमिता शेट्टीसोबत तिची आई सुनंदा शेट्टीही दिसत आहे.5 / 7 हे फोटो विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. शमिताची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या दोन मुलांसह अलिबागला रवाना झाली आहे.6 / 7‘व्हॅलेंटाइन डे’ च्या एक दिवस आधी शमिता-राकेश कुटुंबासोबत अलिबागला रवाना झाल्याने त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे. 7 / 7 शिल्पा शेट्टी व्हाईट टी-शर्ट आणि स्किन कलरच्या पँटमध्ये मुलगी समिशाला घेऊन कॅमे-यासमोर पोझ देताना दिसली. आणखी वाचा Subscribe to Notifications