शरद पवार देशाच्या राजकारणातील महान "चाणक्य"; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 1:19 PM1 / 10राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. 2 / 10त्यांचा वाढदिवस देशपातळीवर विविध ठिकाणी साजरा केला जातो. महाराष्ट्रात आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. अर्थात, पवार कुटुंबीयांकडूनही हा वाढदिवस साजरा केला जात असतो. 3 / 10यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही. त्यामुळे, शरद पवारांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. 4 / 10मात्र, देशभरातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. राजकीय नेते आणि सेलिब्रीटीही त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, आता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.5 / 10भारतीय राजकारणातील महान 'चाणक्य' आणि महाराष्ट्र/भारताचे खरे 'नायक' शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 6 / 10तसेच, आपणास आनंद, शांती आणि खूप निरोगी व समृद्ध आयुष्य लाभो. आपल्या कुटुंबास मनापासून प्रेम आणि शुभेच्छा. जय महाराष्ट्र! जय हिंद! असे ट्विट करत शत्रुघ्न सिन्हा यांनी शरद पवारांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. 7 / 10देशाच्या राजकारणात सध्या चाणक्य हा शब्द चांगलाच प्रचलित झाला आहे. भाजपा समर्थकांकडून गृहमंत्री अमित शहांना चाणक्य असे संबोधत भाजपच्या यशाचे श्रेय दिले जाते.8 / 10दरम्यान, यंदा शरद पवार नागपुरात असून त्यांची कन्या व खासदार सुप्रिया दिल्लीत आहेत. त्यामुळे, राजधानी दिल्लीतूनच त्यांनीही वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी, व्हिडिओ कॉलवरुन त्यांनी शरद पवारांशी संवाद साधला.9 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार यांच्या वाढदिनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी माझी प्रार्थना, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं. 10 / 10राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात एक गट भाजपासोबत गेला आहे. तर, दुसरा गट शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने मोदी सरकावर टीका केली जाते. मात्र, राजकीय मतभेद बाजुला ठेऊन मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणखी वाचा Subscribe to Notifications