शर्वरी वाघचं मराठमोळं सौंदर्य, मूळ गावी साजरी केली गणेश चतुर्थी; शेअर केले सुंदर Photos By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 2:35 PM1 / 8आज सगळीकडे आनंदात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. थाटामाटात गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. अभिनेत्री शर्वरी वाघने (Sharvari Wagh) शेअर केलेले फोटो खूपच खास आहेत.2 / 8शर्वरी वाघ दरवर्षी कुटुंबासोबत तिचं मूळ गाव मोरगाव येथे गणेश चतुर्थी साजरी करते. या ठिकाणी त्यांचा १०० वर्ष जुना वाडा आहे. तिथे घरातील १५ वर्ष जुन्या मंदारच्या झाडावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गणेशाच्या मूर्तीचीच वाघ कुटुंबीय पूजा करतात.3 / 8शर्वरी ही दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. मनोहर जोशी यांची लेक नम्रता वाघ यांची ती मुलगी आहे. शर्वरीने दरवर्षीप्रमाणे आई आणि बहिणीसोबत सुरेख फोटो शेअर केले आहेत. 4 / 8मायलेकी जांभळ्या रंगाच्या साडीत नटून थटून तयार झाल्या आहेत. आईचं सौंदर्यच दोन्ही मुलींमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 8शर्वरीच्या मोठ्या बहिणीचं नाव कस्तुरी वाघ आहे. कस्तुरीही तिच्याइतकीच दिसायला सुंदर आहे. दोघींचा वाड्यासमोर पायऱ्यांवर काढलेला हा फोटो खूपच सुरेख आला आहे. 6 / 8शर्वरीने नेसलेली ही जांभळी कांजीवरम साडी ३५ वर्ष जुनी आहे. तिच्या आजीकडून ती तिच्या आईकडे आली आणि आज तिला आईने ही साडी दिली , असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे नक्कीच ही साडी तिच्यासाठी खूप खास आहे.7 / 8अगदी मराठी मुलगी प्रमाणेच शर्वरी या लूकमध्ये उठून दिसत आहे. आज तिचं बॉलिवूडमध्ये नाव असलं तरी तिचं महाराष्ट्रीयन प्रेम कायम आहे. तसंच गणेशोत्सव हा तिचा सर्वात आवडता सण असल्याचंही ती सांगते.8 / 8एकंदर शर्वरीच्या या मराठमोळ्या सौंदर्यावर चाहतेही फिदा झालेत. शर्वरी आगामी 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या सिनेमात ती आलिया भटसोबत अॅक्शन भूमिकेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications