Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले... By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:59 AM1 / 10सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.2 / 10दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून झालेला वाद तुम्ही पाहिलाच. तसाच वाद उर्फी जावेदच्या कपड्यांवरूनही पाहायला मिळतोय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर तोंडसुख घेतलं आहे. 3 / 10या सगळ्या वादाच्या गदारोळात शर्वरी वाघ हिच्या बोल्ड लुकनं सर्वांच्या भुवया उंचावल्या. नेटकरी तिच्या या लुकवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.4 / 10होय, मुंबईच्या एका इव्हेंटमध्ये शर्वरी उर्फीसारखेच कपडे घालून पोहोचली अन् पुन्हा चर्चेला उधाण आलं. दीपिकासारख्या तिच्या भगव्या बिकिनी लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.5 / 10या इवेंटला शर्वरीने भगव्या रंगाचा बिकिनी सेट आणि त्यावर ओवरसाइज ब्लेजर घातला होता. त्यावर तिने कटआऊट नेट स्कर्ट्स परिधान केला होता.6 / 10शर्वरीचा हा लुक पाहून सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. 'आता भगव्या रंगाचा अपमान नाही का' असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. 7 / 10एका यूजरने शर्वरीची तुलना चक्क उर्फी जावेदशी केली आहे. 'आता उर्फी काही फॅशन काढणार आणि इतर नट्या ती फॉलो करणार' अशी कमेंट या केली आहे.8 / 10शर्वरी वाघने नुकताच ‘बंटी और बबली 2’मधून दमदार बॉलिवूड डेब्यू केला. तिची आणखी एक ओळख द्यायची झाल्यास, ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 9 / 10 शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि आई आर्किटेक्ट आहे. शर्वरीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली.10 / 10शर्वरी सध्या विकी कौशलचा भाऊ सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा आहे. विकी व कतरिनाच्या लग्नाला शर्वरी सुद्धा हजर होती. या लग्नातील तिचा वावर पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications