'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक Photo, नेटकऱ्यांनी केली उर्फीशी तुलना By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 1:42 PM1 / 8'व्हॅलेंटाईन डे' निमित्त काटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने पतीसोबतचे काही रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 8शेफाली नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते. कधी हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात तर अनेकदा ती ट्रोलही होते. 3 / 8विचित्र कपडे म्हणलं की आजकाल उर्फी जावेदच डोळ्यासमोर येते. मात्र आता इतर अभिनेत्रींचे फोटो बघून त्यांची तुलना उर्फीशी केली जाते.4 / 8शेफालीने नुकत्याच पोस्ट केलेल्या या फोटोतील तिची फॅशन बघून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. उर्फी कडून प्रेरणा घेतली का अशा कमेंट्स तिला या फोटोंवर आल्या आहेत. 5 / 8२००२ मध्ये ‘कॉंटा लगा’ या गाण्याने शेफाली जरीवाला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर पोहोचली. होती सध्या तिचे सोशल मीडियावरील बोल्ड अॅंड ब्युटिफुल फोटो पाहून अनेकांना विश्वास बसत नाही.6 / 8शेफाली अभिनयापासून लांब आहे मात्र तरी तिची चर्चा अधूनमधून सुरुच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे.7 / 8शेफालीचं वय ४० वर्षे आहे मात्र तिच्या फोटोंकडे बघून तिच्या वयाचा अंदाजही लागत नाही. बिकीनी असो किंवा स्कर्ट ती प्रत्येक लुकमध्ये फिट दिसते.8 / 8शेफालीने तिचा पती 'पराग त्यागी' सोबतही फोटो पोस्ट केले आहेत. पराग आणि शेफालीने २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. या कपलचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications