"दिग्दर्शकाने माझी 'ब्रेस्ट साईज' विचारली, त्यानंतर एक घाणेरडी मागणी केली अन् मी..." By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 10:16 PM1 / 9Shocking Revelations Bollywood Dirty things: बॉलिवूडमध्ये फार थोडे सिनेमे करणाऱ्या एका अभिनेत्रीने नुकताच बॉलिवूडमधील एक अतिशय भयंकर प्रसंग सांगितला. कास्टिंग काऊचबद्दल अनेकवेळा अनेक अभिनेत्रींनी आपली बाजू मांडली आहे. मात्र नुकतीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्याबरोबर घडलेल्या एक विचित्र किस्सा सांगितला.2 / 9अभिनेत्रीला थेट तिच्या ब्रेस्ट साईजबद्दल विचारण्यात आले. इतकेच नव्हे तर दिग्दर्शकाने थेट मी तुझ्या त्या भागाला स्पर्श करू शकतो का? असेही विचारलं असल्याचा धक्कादायक खुलासा या अभिनेत्रीने केला.3 / 9दिल बोले हडिप्पा, जवानी दिवानी, रेड स्वस्तिक, वजह तूम हो, माया अशा मोजक्या बॉलिवूड चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव शर्लिन चोप्रा. तिने नुकताच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील काही विचित्र अनुभव सांगिलते.4 / 9शर्लिन चोप्राबाबत सामान्यपणे चाहत्यांची फारशी चांगली मतं नाहीत. आपल्या अति बोल्ड फॅशन सेन्समुळे आणि विचित्र कपड्यांच्या पेहारावामुळे तिच्यावर सहसा टीकाच केली जाते.5 / 9नुकतीच शर्लिन चोप्रा साडी नेसून पण डीप नेक ब्लाऊज घालून सार्वजनिक ठिकाणी आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याच दरम्यान तिच्या मुलाखतीने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.6 / 9शर्लिन चोप्रा आगामी 'पौरषपूर 2' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये तिने खूप इंटिमेट सीन शूट केल्याची चर्चा आहे. या निमित्ताने सिद्धार्थ कन्नन याला तिने मुलाखत दिली. त्यावेळी तिने ब्रेस्ट साइजबद्दल विचारलेल्या प्रश्नांबद्दल सांगितले. 7 / 9शर्लिन म्हणाली- 'एका प्रोजेक्टच्या दरम्यान मला एका डायरेक्टरने थेट प्रश्न केला होता की माझी ब्रेस्ट साइज काय आहे आणि मी सर्जरी केली आहे का? मला खोटं बोलायचं नव्हतं त्यामुळे मी त्याला खरं काय ते सांगितलं.'8 / 9'सर्जरी केल्याची गोष्ट कळल्यानंतर त्याने तो विषय सोडून द्यायला हवा होता. पण त्याने पुढे मला विचारलं की मी तुमच्या त्या भागाला स्पर्श करू शकतो का?', असं शर्लिनेने पुढे सांगितलं.9 / 9'त्यावेळी माझ्यासोबत असं काहीतरी घडत आहे हे समजताच मला धक्काच बसला. एखाद्या अभिनेत्रीची 'ब्रेस्ट साईज' पाहून मग लोक थिएटरला जातात का? असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला,' असा भयानक अनुभव तिने सांगितला. आणखी वाचा Subscribe to Notifications