'हा' अभिनेता ठरला 'शोले'साठी सर्वाधिक मानधन घेणारा स्टार; अमिताभ, संजीव कुमारलाही टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 11:47 IST
1 / 10बॉलिवूडच्या इतिहासात तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे शोले. या सिनेमातील संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. त्यामुळे या कलाकारांनी किती मानधन घेतलं होतं ते जाणून घेऊयात.2 / 10१९७५ ला रिलीज झालेल्या शोले या सिनेमात बच्चन (जय), धर्मेंद्र (वीरू), हेमा मालिनी (बसंती), अमजद खान (गब्बर), संजीव कुमार (ठाकुर) आणि जया बच्चन (राधा) ही तगडी स्टारकास्ट झळकली होती.3 / 10हेमा मालिनी- मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी हेमा मालिनीने ७५ हजार रुपये मानधन घेतलं होतं. या सिनेमात तिने बसंती ही भूमिका साकारली होती. ही भूमिका आजही लोकप्रिय आहे.4 / 10धर्मेंद्र - शोलेमध्ये धर्मेंद्रने मुख्य भूमिका साकारली होती. वीरुच्या भूमिकेसाठी त्याने १ लाख ५० हजार रुपये मानधन घेतलं होतं.5 / 10अमिताभ बच्चन- धर्मेंद्रप्रमाणेच अमिताभ सुद्धा या सिनेमात सेकंड लीड होते. या सिनेमासाठी त्यांनी १ लाख रुपये फी घेतली होती. 6 / 10जया बच्चन- शोले मध्ये जया बच्चन यांनी राधा ही भूमिका साकारली होती. ठाकूरच्या सुनेसाठी जया यांना ३५ हजार रुपये मानधन मिळालं होतं. 7 / 10असरानी- या सिनेमात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे असरांनी. शोलेमध्ये इंग्रजांच्या जेलरची भूमिका साकारणाऱ्या असरानी यांना १५ हजार रुपये मानधन मिळालं होतं.8 / 10संजीव कुमार- शोले या सिनेमाचं संपूर्ण कथानक ज्या व्यक्तीच्या भोवती फिरत होतं ती मुख्य भूमिका म्हणजे संजीव कुमार. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या संजीव कुमार यांनी १ लाख २५ हजार रुपये मानधन घेतलं होतं.9 / 10अमजद खान- गब्बर ही भूमिका अजरामर करणाऱ्या अमजद खान यांनी या सिनेमासाठी ५० हजार रुपये मानधन घेतलं होतं.10 / 10जगदीप - या सिनेमातील सुरमा भोपाली ही भूमिका सुद्धा बरीच गाजली. ही भूमिका अभिनेता जगदीप यांनी वठवली होती. या भूमिकेसाठी त्यांनी १२ हजार रुपये घेतले होते.