श्रद्धा कपूरची मावशी आहे 'ही' मराठी अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 12:35 IST
1 / 9श्रद्धा कपूर ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. शक्ती कपूर या सुप्रसिद्ध अभिनेत्याची श्रद्धा मुलगी आहे. 2 / 9वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रद्धाने बॉलिवूडमध्ये करिअर करायचं ठरवलं. श्रद्धा कपूरची आईदेखील अभिनेत्री आणि गायिका होत्या. पण, लग्नानंतर त्यांनी करिअर सोडलं. 3 / 9श्रद्धा कपूरची मावशीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. 4 / 9गेल्या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या आणि अभिनयाने बॉलिवूड गाजवलेल्या श्रद्धाची मावशी एक मराठी अभिनेत्री आहे, हे तुम्हाला माहितीये का? 5 / 9शक्ती कपूर यांनी १९८२ साली शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लग्न केलं. शिवांगी कोल्हापुरे या लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या बहीण आहेत. 6 / 9अनेकदा श्रद्धा पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करताना दिसते. 7 / 9श्रद्धा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा साडीतील मराळमोळ्या वेशातील पारंपरिक फोटो व्हायरल झाला होता. 8 / 9तेव्हा श्रद्धा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यात नेमकं काय कनेक्शन आहे, अशी चर्चा रंगली होती.9 / 9पद्मिनी कोल्हापुरे यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रेम रोग, साजन बिना सुहागन, विधाता, किरायादार, सुहागन, स्वर्ग से सुंदर अशा सिनेमांनी त्यांनी ८०-९०चं दशक गाजवलं.