Join us

Sidharth-Kiara Love Story: पार्टीतील ‘ती’ पहिली भेट, ब्रेकअप ते लग्न..., अशी सुरू झाली होती सिद्धार्थ कियाराची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 2:45 PM

1 / 13
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी उद्या ६ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा होणार आहे.
2 / 13
कियारा व सिद्धार्थ आपल्या कुटुंबासह जैसलमेरला पोहोचले आहेत. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
3 / 13
सिद्धार्थ व कियाराच्या अफेअरची दीर्घकाळापासून चर्चा होती. मात्र दोघांनीही दीर्घकाळ आपलं नातं जगापासून लपवून ठेवलं होतं.
4 / 13
या कपलची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
5 / 13
‘शेरशाह’च्या सेटवर सिद्धार्थ व कियाराची लव्हस्टोरी सुरू झाली, असं म्हटलं जातं. पण असं नाहीये. त्याआधीच दोघांची भेट झाली होती.
6 / 13
'कॉफी विद करण 7'मध्ये खुद्द कियाराने या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं. तर २०१८ मध्ये कियारा व सिद्धार्थ पहिल्यांदा भेटले होते.
7 / 13
'लस्ट स्टोरीज'ची रॅप अप पार्टी होती. या पार्टीत दोघंही पहिल्यांदा भेटले. त्या रात्री दोघांनी खूप गप्पा मारल्या. कदाचित हीच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरूवात होती.
8 / 13
त्यानंतर काही वर्षांनी सिद्धार्थ आणि कियारा दोघांनी ‘शेरशहा’ हा एकत्र चित्रपट साईन केला. दोघेही आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र होतेच. चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली.
9 / 13
२०२० मध्ये दोघांनी न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत. दोघांनीही वेगवेगळे फोटो शेअर केले होते. पण दोघांनीही एकत्र न्यू ईअर सेलिब्रेट केलं हे ओळखायला लोकांना वेळ लागला नाही.
10 / 13
यानंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या. रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये दोघांनी आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. अगदी हे नातं घरापर्यंत पोहोचलं.
11 / 13
यानंतर कियाराच्या आई-वडिलांनी सिद्धार्थच्या घरच्यांना जेवायला बोलावलं. यावेळी सिद्धार्थ आणखी कियारा एकमेकांच्या घरच्यांना भेटले. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाला संमती दर्शवली.
12 / 13
अर्थात इतकंच नव्हतं. याचदरम्यान अचानक सिद्धार्थ व कियाराच्या ब्रेकअपच्या बातम्याही कानावर आल्यात. अर्थात दोघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की सगळे गैरसमज दूर करत, दोघंही पुन्हा जवळ आलेत.
13 / 13
कियाराने भूल भुलैय्या २ साठी सिद्धार्थला फोन केला. यावेळी आपण दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची जाणीव दोघांना झाली आणि कियारा व सिड यांच्यात सगळं काही ठीक झालं. आता हे कपल लग्न करतंय.
टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीबॉलिवूड