Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याने मांडीवर बसवलं अन्...", 'सिकंदर'मधील अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:05 IST

1 / 7
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान 'सिकंदर' सिनेमामुळे चर्चेत आहे. परंतु, सध्या सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाही.
2 / 7
'सिकंदर'मध्ये सलमान खान आणि रश्मिकासह प्रतिक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, किशोर, संजय कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रेया गुप्तो देखील पाहायला मिळतेय.
3 / 7
'सिकंदर'मध्ये श्रेया एका मेडिकल विद्यार्थीनीच्या भूमिकेत झळकली आहे.
4 / 7
अशातच अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्रेयाने कास्टिंग काऊचविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
5 / 7
अलिकडेच डीएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, 'करिअरच्या सुरुवातीला चेन्नईमध्ये मला अशा काही कटू परिस्थितींचा सामना करावा लागला, पण मुंबईत आल्यानंतर माझा अनुभव पूर्णपणे वेगळा आणि सकारात्मक होता. इथे मला नोकरीच्या चांगल्या संधी आणि सुरक्षित वातावरण मिळालं.'
6 / 7
'त्यावेळी एका लोकप्रिय दिग्दर्शकाने मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. दरम्यान, मी माझे पोस्ट ग्रज्यूएशन पूर्ण केल्यानंतर आईसोबत ऑडिशनसाठी तिथे गेले होते.' असं ती म्हणाली.
7 / 7
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, 'तेव्हा तो दिग्दर्शक खूप चुकीच्या पद्धतीने बोलला. मला त्याच्या मांडीवर बसून तो सीन दाखवायला सांगितला. मी त्यावेळी खूपच लहान होते. पण, मी शक्कल लढवली आणि तिथून पळ काढला.' असा खुलासा तिने केला.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमासलमान खान