Join us

In Pics: मन्सूर अली खान पतौडींच्या प्रेमात वेडी होती सिमी! या कारणामुळे आले होते एकमेकांच्या जवळ!!

By रूपाली मुधोळकर | Updated: October 17, 2020 08:00 IST

1 / 10
सिमी गरेवाल म्हणजे बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी. वाढत्या वयाची एकही खुण तिच्या चेह-यावर दिसत नाही. सत्तरी ओलांडलेल्या सिमीकडे पाहिले की, ती पूर्वीइतकीच सुंदर आणि तरूण दिसते. आज याच एव्हरग्रीन अभिनेत्रीचा वाढदिवस.
2 / 10
सिमीचा जन्म दिल्लीत झाला. पण ती लहानाची मोठी झाली ती इंग्लंडमध्ये. वयाच्या 15 व्या वर्षी सिमीला ‘टार्जन गोज टू इंडिया’ हा सिनेमा ऑफर झाला.
3 / 10
पहिल्याच चित्रपटात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि सिमीने या संधीचे सोने केले. तिच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले. पुढे राज कपूर, सत्यजीत रे, मृणाल सेन आणि राज खोंसला यासारख्या दिग्गजांच्या चित्रपटात सिमी झळकली.
4 / 10
70 च्या दशकात सिमीने बोल्ड अभिनेत्री अशी ओळख निर्माण केली. बॉलिवूडचा पहिला न्यूड सीन कुण्या अभिनेत्रीने दिला तर सिमीने.
5 / 10
होय, 1972 मध्ये रिलीज झालेल्या ‘सिद्धार्थ’ या सिनेमात सिमीने न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा बॉलिवूडचा पहिला न्यूड सीन होता.
6 / 10
या सीनमध्ये शशी कपूर न्यूड सिमच्या समोर उभे दिसतात. या सीनचे छायाचित्र दोन इंग्रजी मासिकांनी आपल्या कव्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या याच न्यूड सीनमुळे ‘सिद्धार्थ’ हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता.
7 / 10
सिमी रिल लाईफमध्ये जितकी बोल्ड होती, तितकीच रिअल लाईफमध्येही. तिचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले.
8 / 10
पाकिस्तानमधील व्यावसायिक सलमान तासीरबरोबरचे सिमीचे अफेअर बरेच गाजले होते. हेच सलमान तासीर पुढे पाकिस्तानचे गव्हर्नर बनले होते. काही वर्षे नात्यात राहिल्यानंतर हे दोघे वेगळे झाले.
9 / 10
सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याबरोबरही सिमीचे जोडले गेले. असे म्हटले जाते, की शर्मिला टागोर त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वी टायगर पतौडी सिमीच्या प्रेमात होते.
10 / 10
पतौडी व सिमी दोघांनाही पाश्चात्य संस्कृती आवडायची. हीच एक आवड दोघांमध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. मात्र शर्मिला आयुष्यात आल्यानंतर पतौडींनी सिमीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पतौडी यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर सिमीच्या आयुष्यात रवि मोहनची एन्ट्री झाली. दोघांनीही लग्न केले. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांनी घटस्फोट घेतला.
टॅग्स :सिमी गरेवाल