‘बेबी डॉल’ पुन्हा प्रेमात? तीन मुलांची आई Kanika Kapoor दुसऱ्यांदा करणार लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:01 IST
1 / 8बेबी डॉल, चिट्टीयां कल्लाइयां, टुकूर टुकूर अशी गाणं गाणारी आणि या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारी सिंगर कनिका कपूर हिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.2 / 8 कनिका कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. होय, येत्या मे महिन्यात एका एनआरआय बिझनेसमॅनसोबत कनिका लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय.3 / 8 अद्याप कनिकाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,गौतम असं या बिझनेसमॅनचं नाव आहे. तो लंडनचा राहणारा आहे.4 / 8लग्न झालंच तर कनिकाचं हे दुसरं लग्न असेल.कनिका 3 मुलांची (दोन मुली आणि एक मुलगा) आई आहे. 1997 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी तिचं पहिलं लग्न झालं होतं. उद्योगपती राज चंडोकशी तिचा विवाह झाला होता. 2012मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.5 / 8कनिका कपूर उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये लहानाची मोठी झाली. कनिका लहानपणापासून गायिका व्हायचं होतं. पण वयाच्या केवळ 18 व्या वर्षी 1997 साली तिने एनआरआय बिझनेसमॅन राज चंडोकसोबत लग्न केलं. लग्नानंतर कनिका लंडनमध्ये शिफ्ट झाली.6 / 8 लग्नानंतर कनिकाला तीन मुले झालीत. पण कालांतराने हे लग्न मोडलं. 2012 मध्ये कनिकाचा पतीसोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कनिका मुंबईला परतली आणि तिने सिंगींग करिअर सुरु केलं.7 / 8कनिकाचं पहिलं गाणं जुगनी जी 2012 मध्ये रिलीज झालं. हे गाणं जबरदस्त लोकप्रिय झालंपण तिच्या करिअरला ‘बेबी डॉल’ या गाण्याने एका नव्या उंचीवर नेलं. या गाण्यामुळे कनिकाला बॉलिवूडची मोठी प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ती एका रात्रीत स्टार झाली.8 / 8‘रागिनी एमएमएस 2’चं बेबी डॉल हे गाणं सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आलं आहे. हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. या गाण्यासाठी कनिकाला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.