Join us

Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 5:33 PM

1 / 11
लोकप्रिय गायिका नेहा भसीन सध्या खूप कठीण टप्प्यातून जात आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत तिने आपल्या चाहत्यांना आजाराविषयी सांगितलं आहे.
2 / 11
नेहाने सांगितलं की ती लहानपणापासून प्रीमेनस्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डर (पीएमडीडी) सारख्या आजाराशी झुंज देत आहे. हा एक गंभीर आजार असून त्याच्या लक्षणांमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण होतात.
3 / 11
नेहाने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं. नेहाने लिहिलं की, 'मला लहानपणापासून प्रीमेन्स्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डर आहे. मी २०२२ पासून कमी प्रोजेस्टेरॉनचा देखील त्रास होत आहे.'
4 / 11
'महिन्यातील १५ दिवस नीट उठून काम करण्यासही मला खूप त्रास होतो. अनेक वर्षे उपचार शोधल्यानंतर, मी आता कंटाळले आहे आणि पीएमडीडीने माझं आयुष्य माझ्यापासून हिरावून घेतलं आहे आणि मी आता हळूहळू हरवत चालले आहे.'
5 / 11
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वजन १० किलोने वाढले आहे आणि मी आधीच बॉडी डिसमॉर्फियाशी झुंज देत होते. खाण्याच्या विकारामुळे मी कधी बरी होते, कधी होत नाही.'
6 / 11
'अँटी डिप्रेसेंट्समुळे माझं वजन आणखी वाढत आहे. या काळात मी १० तास एका अंधाऱ्या खोलीत एकटी बसते. मी आता बरी होत आहे. मलाही मदत मिळाली आणि जेव्हा जेव्हा माझ्यावर वाईट दिवस येतात तेव्हा मी त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करते.'
7 / 11
पोस्टच्या शेवटी नेहा देखील खूप नाराज झालेली दिसत आहे. लोक तिला तिच्या वजनावरून ट्रोल करत आहेत, त्यामुळे खूप वाईट वाटतं असंही म्हटलं आहे.
8 / 11
नेहाच्या पोस्टवर, तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी आणि चाहत्यांनी तिच्या हिमतीची प्रशंसा केली आणि तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं.
9 / 11
नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत आणि तिची बहुतेक गाणी सुपरहिट झाली आहेत. 'स्वग से स्वागत' हे गाणं खूप लोकप्रिय आहे.
10 / 11
लोकप्रिय गायिका नेहा भसीन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
11 / 11
टॅग्स :नेहा भसीनबॉलिवूड