Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:07 PM1 / 9करीना कपूरने 'रिफ्युजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला आता चित्रपटसृष्टीत २५ वर्षे झाली आहेत. पदार्पणापासूनच ती चित्रपटांमध्ये एक्टिव्ह आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. 2 / 9एका मुलाखतीदरम्यान करीना कपूरने तिच्या अभिनयाच्या दीर्घ प्रवासाबद्दल सांगितलं. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं तिच्यासाठी किती कठीण होतं हे तिने सांगितलं आहे.3 / 9टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, 'वयाच्या १७-१८ व्या वर्षी प्रत्येक चित्रपटात येण्याची इच्छा होती. जर तुम्ही एक दशक टिकून राहिलात, तर ते री-इन्वेन्शन आहे, जे पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत भीतीदायक आहे.'4 / 9'गेल्या काही वर्षांत माझ्याशिवाय इतरही अनेक धाडसी अभिनेत्री आहेत ज्यांनी खूप प्रगती केली आहे. प्रत्येक पाच वर्षांनी मी स्वतःला विचारते, आता मी काय नवीन करू शकते?'5 / 9'हे केवळ यशस्वी चित्रपटांचा भाग बनण्याबद्दल नाही तर वारसा लाभल्याबद्दल आहे. मी अशा कुटुंबातून (कपूर कुटुंब) आले आहे, जिथे मला आव्हान दिलं गेलं आहे कारण ते सर्व अद्भुत अभिनेते आहेत.'6 / 9'मला कुठेतरी माझा ठसा उमटवायचा आहे. दर दहा वर्षांत कोणी ना कोणी नवीन येतात, तर यामध्ये कशी टिकणार? अशा वेळी स्वत:ला यामध्ये टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. म्हणून मला वेगवेगळे पर्याय निवडायला आवडतात.'7 / 9'मग ते बकिंघम मर्डर्स असो, सिंघम, क्रू किंवा या जाने जान हो असो, जे एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आलं आहे. मला वाटतं हे मोठ्या पडद्यावरही चांगली कामगिरी करतील.'8 / 9करीना कपूर मर्डर-मिस्ट्री फिल्म 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण स्टारर हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications