Join us

बॉबी देओलच्या लग्नात गाण्याचे मिळाले होते १५० रूपये, आज आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा गायक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 6:13 PM

1 / 8
बॉलिवूड स्टार बॉबी देओलने १९९५ मध्ये 'बरसात' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर १ वर्षाने बॉबीने तान्या आहूजासोबत लग्न केलं. बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असलेली तान्या एक बिझनेसवुमन आहे. तान्या इंटेरिअर डिझायनर आहे.
2 / 8
बॉडी देओल आणि तान्याच्या लग्नाला आता जवळपास २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे कपल आजही सोबत आहे आणि एकमेकांवर खूप प्रेम करतं. हेच कारण आहे की, आजपर्यंत बॉबी देओलचं दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं नाही.
3 / 8
बॉबी देओल आणि तान्या देओल यांचं लग्न यासाठीही खास आहे कारण या लग्नामुळे बॉलिवूडला एक मोठा गायक मिळाला. बॉलिवूडमध्ये चर्चा झालेल्या या लग्नात एका तरूणा गायकाने परफॉर्मन्स दिलं होतं. आज तो गायक बॉलिवूडचा नंबर एक गायक आहे. हा गायक दुसरा तिसरा कुणी नाही तर मीका सिंह(Mika Singh) आहे. २५ वर्षांनंतर मीकाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला.
4 / 8
बॉलिवूड सिंगर मीका सिंह नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये आला होता. यावेळी त्याने देओल फमिलीसमोर या गोष्टीचा खुलासा केला. मीका म्हणाला की, बॉबी देओलच्या लग्नात त्याला पहिल्यांदा गिटार वाजवण्याची आणि गाण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्याला डीजेमध्ये परफॉर्म करण्यासाठी १५० रूपये मिळाले होते.
5 / 8
बॉलिवूडच्या या हायप्रोफाइल लग्नात गाणं गायल्याने मीकाला ओळखही मिळाली होती. त्यानंतर त्याच्याकडे कॉन्सर्ट आणि अल्बमच्या ऑफरही आल्या. यानंतर मीकाने वर्ष अनेक मोठे स्टेज शो केले आणि तो पंजाब फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय झाला. १९९८ मध्ये मीकाचा पहिला अल्बम 'सावन मे लग गई आग' रिलीज केला. यातील गाण्याने तो रातोरात स्टार बनला.
6 / 8
यानंतर मीका एकपाठी एक हिट गाणी देऊ लागला. 'इश्क ब्रांडी', गबरू, 'समथिंग समथिंग मेरी जान', 'जट्टां का छोरा', 'दोनाली, 'बोलियां', 'बिल्लो यार दी' ने तो पंजाबी फ़िल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय झाला. २००० साली तो बॉलिवूडकडे वळला. इथेही त्याला वेगळं स्थान मिळालं. पण त्याला यश मिळायला ६ वर्षे लागली. २००६ मध्ये त्याने पहिलं गाणं 'अपना सपना मनी मनी' मध्ये गायलं होतं.
7 / 8
या सिनेमातील 'देखा जो तुझे यार' हे गाणं इतकं हिट झालं की, मीका बॉलिवूडच्या मोठ्या गायकांच्या यादीत आला. तेव्हापासून मीकाने कधी मागे वळून पाहिलं नाही. त्याने'मौजा ही मौजा', 'ऐ गणपत चल दारू ला', ओए लकी! लकी ओए!, सिंह इस किंग, 'भूतनी के', 'सुबह होने न दे', 'ढिंक चिका', 'जुगनी', 'बन गया कुत्ता', 'प्यार की पुंगी', 'गन्दी बात, 'तू मेरे अगल बगल', 'जुम्मे की रात', 'आज की पार्टी' और 'लग गये 440 वोल्ट' सारखी सुपरहिट गाणी दिली.
8 / 8
आज मीका सिंह ना केवळ बॉलिवूडचा नंबर वन सिंगर तर तो सर्वात जास्त पैसे घेणारा गायक आहे. मीका दर महिन्याला ७० लाख रूपयांच्या आसपास कमाई करतो. त्याच्याकडे आज पैशांची कमतरता नाही. मीकाची लाइफस्टाईलही बॉलिवूडच्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. काही रिपोर्ट्सनुसार मीका आज ८० कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
टॅग्स :मिका सिंगबॉबी देओलबॉलिवूड