Join us  

बॉलिवूडमधील या बहिणींच्या जोड्या करतात रक्षाबंधनाचं जोरदार सेलिब्रेशन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 3:13 PM

1 / 8
मलायका अरोरा आणि तिची बहिणा अमृता अरोरा. मलायका-अमृता या बहिणींची जोडी बॉलिवूडमध्ये चर्चेत असते.
2 / 8
श्रीदेवीच्या लेकी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. दोन्ही बहिणी अभिनेत्री असून खुशीनेही काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या The Archies सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं होतं
3 / 8
क्रिती सेननच्या बहिणीचं नाव आहे नुपूर सेनन. नुपुर सुद्धा दिसायला सुंदर असून ती सुद्धा बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात करिअर करतेय
4 / 8
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन बहिणींची जोडी म्हणजे करिश्मा कपूर आणि करिना कपूर. दोघींची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही. गेली अनेक वर्ष दोघीही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत
5 / 8
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसीच्या बहिणीचं नाव आहे शगून. तापसीची बहीण शगून सध्या इंजिनीअरींगचं शिक्षण घेतेय
6 / 8
आलिया भटची मोठी बहीण पूजा भट आपल्या सर्वांना माहितच आहे. पण आलियाला आणखी एक बहीण आहे तिचं नाव शाहीन. आलियाची बहीण शाहीन एक लेखिका आहे.
7 / 8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिनाच्या बहिणीचं नाव आहे इझाबेल. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी इझाबेल उत्सुक आहे
8 / 8
परिणीती चोप्रा- प्रियंका चोप्रा या बहिणींचं बॉन्डींग सुद्धा खास आहे. प्रियंका आता इंटरनॅशनल स्टार झाली आहे. तर परिणीती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने काही महिन्यांपूर्वी राघव चढ्ढासोबत लग्न केलं
टॅग्स :रक्षाबंधनजान्हवी कपूरखुशी कपूरक्रिती सनॉनकतरिना कैफतापसी पन्नू