'बजरंगी भाईजान'मधली 'मुन्नी' आठवतेय? सध्या सोशल मीडियावर रंगलीये तिच्याच फोटोशूटची चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 12:35 AM1 / 5२०१५ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' सिनेमा प्रचंड गाजला. पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या चिमुरड्या मुन्नीची ती गोष्ट होती.2 / 5या सिनेमात मुन्नी हे पात्र साकारलेली बालकलाकार हर्षाली मल्होत्रा तेव्हा तिच्या निरागसतेने लोकप्रिय झाली होती. 'बजरंगी भाईजान'मुळे हर्षाली प्रसिद्धीझोतात आली होती. आता मात्र मुन्नी मोठी झाली आहे.3 / 5याच वर्षी मे महिन्यात हर्षालीचा दहावीचा निकाल लागला. त्या परीक्षेत तिने ८३ टक्के गुण मिळवून १०वी पास केली. या यशासोबतच तिने ट्रोलर्सही तोंडं बंद केली.4 / 5मुन्नीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.5 / 5गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील या फोटोत हर्षालीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय सालस आणि निरागस आहेत. हर्षालीच्या याच लोभसवाण्या निरागसतेमुळे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications