Join us  

1000 हून अधिक ऑडिशन्स, रंगामुळे रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीचं 'असं' चमकलं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:43 AM

1 / 10
साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी शोभिता धुलिपाला आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलिंगमधून अभिनयात आलेल्या शोभिता धुलिपालाने फिल्मी दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2 / 10
अभिनेत्रीला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. यासाठी शोभिता धुलिपालाला अनेक रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. शोभिताच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया...
3 / 10
शोभिता धुलिपालाचा जन्म ३१ मे १९९२ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. तिचे वडील मर्चंट नेव्ही इंजिनिअर आहेत आणि आई शिक्षिका आहे. अभ्यासात उत्तम असण्यासोबतच शोभिता भरतनाट्यम आणि कुचीपुडीमध्ये ट्रेन्ड आहे.
4 / 10
एका मित्राच्या सल्ल्यानंतर शोभिताने मॉडेलिंगमध्ये आपलं नशीब आजमावलं. त्यानंतर तिने मिस अर्थ २०१३ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर शोभिता 2014 मध्ये किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये सामील झाली.
5 / 10
मॉडेलिंगमधून अभिनयाच्या जगात येणं शोभितासाठी सोपं नव्हतं. अभिनयाच्या जगात आपला पाय रोवण्यासाठी तिने सलग ३ वर्षे ऑडिशन्स दिल्या आहेत.
6 / 10
अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. तिने तब्बल 1 हजार ऑडिशन्स दिल्या, त्यात तिला फक्त निराशाच मिळाली.
7 / 10
शोभिताने सांगितलं की, आउटसायडर म्हणून यश मिळवणं कठीण होतं. एंटरटेनमेंट रिपोर्ट्स विश्वास ठेवला तर, अभिनेत्रीला तिच्या रंगामुळे बऱ्याच रिजेक्शनना सामोरं जावं लागलं आहे.
8 / 10
शोभिता धुलिपालाने 'रमण राघव 2.0' मधून फिल्मी दुनियेत पदार्पण केलं होतं. हा चित्रपट कान्स २०१५ मध्ये दाखवण्यात आला होता, त्यानंतर अभिनेत्रीचं खूप कौतुक झालं. कान्स २०१५ नंतर अभिनेत्रीचे नशीब चमकलं.
9 / 10
'रमन राघव 2.0' मधून डेब्यू केल्यानंतर, अभिनेत्रीने 'शेफ', 'पोन्नियिन सेलवन', 'गुणाचारी' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'मेड इन हेवन' आणि 'द नाईट मॅनेजर सीझन 1 आणि 2', 'बॉर्ड ऑफ ब्लड', 'द बॉडी' सारख्या सीरिजमध्येही काम केलं आहे.
10 / 10
टॅग्स :बॉलिवूड