Join us

अंगापेक्षा बोंगा मोठा! हटके फॅशन पुरती फसली, ट्रोल झाली सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 1:11 PM

1 / 8
सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सावरिया' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
2 / 8
त्यानंतर 'रांजना', 'प्रेम रतन धन पायो', 'खूबसुरत', 'नीरजा', 'वीरे दी वेडिंग' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं.
3 / 8
सोनम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करत असते.
4 / 8
नुकतेच सोनमने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
5 / 8
पण, तिची ही फॅशन प्रेक्षकांना रुचलेली नाही. हटके फॅशनच्या नादात नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
6 / 8
'हा काय ड्रेस घातला आहे', 'खांद्याला हँगर लावला आहे का?', 'मी तुझा चाहता आहे, पण, हा ड्रेस बिग नो' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 8
तर काहींनी 'फ्रिज बॉक्स वाटतोय', 'एकच प्रश्न का?', 'हा फॅशनेबल ड्रेस असू शकतो, पण चांगला दिसत नाही', असं म्हणत सोनमला ट्रोल केलं आहे.
8 / 8
सोनमचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण, चाहत्यांना तिचा लूक अजिबात आवडलेला नाही.
टॅग्स :सोनम कपूरसेलिब्रिटी