'या' सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला निर्माता; लग्नाला झाले 6 महिने, ठेवली स्पेशल पूजा By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:17 PM1 / 15साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरनसोबत लग्न केलं आहे. त्यांचं लग्न सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे त्यांची जोडी. काही नेटिझन्स त्यांच्या जोडीला अनमॅच्ड म्हणतात. त्यामुळे कधी कधी लोक त्यांना खूप ट्रोल देखील करतात.2 / 15महालक्ष्मी आणि रविंद्र यांना सोशल मीडिया युजर्सची कधीच भीती वाटली नाही. ते दोघंही नेहमीच इंटरनेटवर आपले प्रेम व्यक्त करत असतात. दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडली नाही.3 / 15आता महालक्ष्मी आणि रविंद्र यांच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याचे सहा महिने आनंदात घालवले आहेत. याच निमित्ताने घरी खास पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. 4 / 15महालक्ष्मी आणि रविंद्र यांनी त्यांच्या घरी चांदी होमचे आयोजन केले होते. त्याचा व्हिडिओही निर्मात्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.5 / 15महालक्ष्मीचे दुसऱ्यांदा एका निर्मात्याशी लग्न झाले आहे. याआधी अभिनेत्रीने अनिल नेरेदिमिलीसोबत लग्न केलं होतं. तो आधीच विवाहित होता आणि त्याला एक मूलही आहे. याच दरम्यान, दोघांमध्ये अनेक वाद झाले.6 / 15रिपोर्ट्सनुसार, या वादांमध्ये निर्माता रविंद्र चंद्रशेखरन यांनी त्यांना खूप पाठिंबा दिला होता. दरम्यान, प्रेमात फसवणूक झालेली अभिनेत्री त्याच्या खूप जवळ आली होती. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये दोघांनी लग्न केले.7 / 15महालक्ष्मी आणि रवींद्र शादी यांच्या लग्नाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा आहे. त्यांचे हनिमूनचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यांना नेहमीच ट्रोल करण्यात येतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 15महालक्ष्मी आणि तिचा पती-निर्माता रविंद्र चंद्रशेखरन याची नेहमीच चर्चा रंगली असते. काही दिवसांपूर्वी रविंद्रने आपल्या सुंदर पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहून तिचे आठवे आश्चर्य म्हणून वर्णन केलं होतं.9 / 15रविंद्रने पत्नी महालक्ष्मीसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट केली होती. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला असून यावेळीही दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले होते. याच दरम्यान, त्यांची एक जुनी पोस्टही व्हायरल झाली होती.10 / 15ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा दोघांच्या लग्नाला अवघे चार महिने झाले होते. ख्रिसमसच्या निमित्ताने या अभिनेत्याने आपल्या पत्नीसाठी एक पोस्ट लिहिली आणि तिला आपल्या आयुष्यातील आठवे आश्चर्य म्हणत आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.11 / 15रविंद्रने लिहिलं होतं, 'माझ्या आयुष्यातील आठवे आश्चर्य म्हणजे माझी पत्नी'. यासोबतच साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीनेही या पोस्टवर रिप्लाय देत लिहिले की, 'लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन. तुझ्याशिवाय मी काही नाही. तुम्ही माझे सर्वस्व आहात'.12 / 1513 / 1514 / 1515 / 15 आणखी वाचा Subscribe to Notifications