'आदिपुरुष'फेम अभिनेत्याचा आहे तगडा आहार; 20 पोळ्या, 25 अंडी खाणारा कोण आहे 'हा' हिरो? By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 8:33 AM1 / 10गेल्या काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांमध्ये ओम राऊतच्या आदिपुरुषची चर्चा होती. या सिनेमाला लोकांनी चांगलंच ट्रोल केलं. त्यानंतर आता या सिनेमातील एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.2 / 10आदिपुरुषमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा एक अभिनेता त्याच्या तगड्या आहारामुळे चर्चेत येत आहे.3 / 10सध्या नेटकऱ्यांमध्ये अभिनेता लवी पजनी याची चर्चा रंगली आहे. 4 / 10लवीने आदिपुरुषमध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या भूमिकेविषय़ी आणि आहाराविषयी भाष्य केलं आहे.5 / 10लवी पजनी हा मूळचा पंजाबमधील पटियाला येथे राहत असून त्याने एस.एस. राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर बाहुबली 2: द कन्क्लूजनमध्ये काम केलं आहे. या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.6 / 10लवीने मोसागल्लू आणि राधे या सिनेमातही काम केलं आहे.7 / 10आदिपुरुषमध्ये लवीची निवड कशी झाली हे सांगताना त्याने त्याच्या आहाराविषयी भाष्य केलं.8 / 10पिळदार शरीरयष्टी असल्यामुळे लवीची आदिपुरुषसाठी निवड झाली. लवीची उंची ६ फूट १० इंच आहे. तर, वजन १४० किलो.9 / 10कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी त्याला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे त्याने ६-७ किलो वजन वाढवलं होतं.10 / 10या भूमिकेसाठी तो दररोज २० पोळ्या, २५ अंडी, १किलो चिकन आणि १.५ लीटर दूध प्यायचा. आणखी वाचा Subscribe to Notifications