1300 कोटींची प्रॉपर्टी असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचं आलिशान घर पाहिलंय का?, पाहा Photos By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 2:16 PM1 / 12दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी याचा मुलगा राम चरण याच्याविषयी प्रत्येकालाच ठावूक आहे. राम चरण याने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.2 / 12२००७ साली 'चिरुथा' चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं.तेव्हापासून आतपर्यंत तो सातत्याने सुपरहिट चित्रपट देत असल्याचं पाहायला मिळतं. 3 / 12प्रोफेशनल लाइफसोबतच राम चरणची पर्सनल लाइफदेखील अनेकदा चर्चेत येत असते. यात त्याच्या कुटुंबाविषयी, त्याच्या संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.4 / 12साधारणपणे एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये मानधन घेणाऱ्या राम चरण याचं घर आतून कसं दिसतं ते पाहुयात. 5 / 12 राम चरण याचं घर हैदराबादमधील जुबली हिल्स सारख्या प्राईम लोकेशनमध्ये आहे.6 / 12राम चरण राहत असलेल्या बंगल्याची किंमत ३८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे राम चरणचं हे घर दाक्षिणात्य सेलिब्रेटींमधील सर्वात महागडं घर आहे.7 / 12राम चरण चित्रपटांव्यतिरिक्त ब्रॅण्ड एंडोर्समेंट्स आणि पर्सनल इन्व्हेसमेंटमधून पैसे कमावतो. सोबतच तो एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहे.8 / 12रिपोर्ट्सनुसार, राम चरणची जवळपास १३०० कोटींची प्रॉपर्टी आहे. रामचरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालिक आहे. 9 / 12याशिवाय त्याची रामचरण हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक पोलो टीम देखील आहे. तो माँ टीव्हीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील आहे.10 / 12रामचरण एका सिनेमासाठी जवळपास १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, एस. एस. राजमौली यांच्या , ‘आरआरआर’ या सिनेमासाठी त्याने 45 कोटी रूपये चार्ज केल्याचे सांगण्यात येतं.11 / 12रामचरणचं स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी. 12 / 12रामचरणने १४ जून, २०१२ साली अपोलो हॉस्पिटलमधील एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications