साऊथची ब्युटी क्वीन! २३ व्या वर्षीच प्रेक्षकांना लावलं वेड, वरुण धवनसोबत करणार बॉलिवूड डेब्यू! By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 1:29 PM1 / 9मनोरंजनविश्वात सध्या बॉलिवूडसह साऊथ अभिनेत्रींचाही बोलबाला आहे. नयनतारा, समंथा, रश्मिका मंदाना, राशी खन्ना या अभिनेत्रींचं नशीबच उजळलं आहे. आता आणखी एक साऊथ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये डंका गाजवण्यासाठी तयार आहे.2 / 9ही आहे साऊथची यंग सेन्सेशन अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela). वयाच्या फक्त २३ व्या वर्षी तिचा बोलबोला आहे. श्रीलीला लवकरच बॉलिवूड डेब्यू करत आहे. वरुण धवनसोबत आगामी एका कॉमेडी सिनेमात ती झळकणार आहे.3 / 9श्रीलीला साऊथमधली सर्वात चर्चेतली तरुण अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच ती भरतनाट्यम, डान्स आणि अभिनयात पारंगत आहे. एक्सप्रेशन्ससाठी ती जास्त लोकप्रिय आहे.4 / 914 जून 2001 साली श्रीलीलाचा मिशिगन, युएसमध्ये जन्म झाला. मात्र ती बंगळुरुमध्ये लहानाची मोठी झाली. तिची आई स्वर्णलता बंगळुरुतील प्रसिद्धी स्त्री रोग तज्ञ आहेत. 5 / 9श्रीलीलाची आईवडिलांचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला होता. तिचे वडील प्रसिद्ध व्यावसायिक सुरापनेनी शुभाकर राव आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी श्रीलीलाला आपली मुलगी मानण्यास नकार दिला होता. कारण श्रीलीलाचा जन्म त्यांच्या घटस्फोटानंतर झाला होता. 6 / 9श्रीलीला सुद्धा मेडिसीनचा अभ्यास करत आहे. 2017 साली तिने 'चित्रांगादा' मधून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. यावर्षी महेश बाबूसोबत 'गुंटूर कारम' चं शूट झाल्यानंतर तिने फायनल परिक्षांसाठी ब्रेक घेतला होता. 7 / 9श्रीलीलाने दोन कन्नड सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. तिच्या लुक्स आणि एक्सप्रेशन्सवर प्रेक्षक फिदा झाले. 2021 मध्ये तिने Pelli SandaD' या सिनेमातून तेलुगू इंडस्ट्रीक पदार्पण केलं.8 / 92022 साली तिने 'धमाका' सिनेमात रवी तेजासोबत भूमिका साकारली. हा सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर प्रेक्षक श्रीलीलासाठी वेडेच झाले.9 / 9श्रीलीलाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तिला वरुण धवनसोबत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. डेव्हिड धवन सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications