१०० कोटी खर्च! बायकोच्या साडीची किंमत तर... Jr NTR च्या लग्नाचा असा होता थाट By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 3:52 PM1 / 10RRR फेम दाक्षिणात्य सुपरस्टार Jr NTR चा साऊथमध्ये मोठा दबदबा आहे. तेलुगू सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेते एन टी रामाराव यांचा तो नातू आहे. तर त्याचे वडीलही प्रसिद्ध अभिनेते, निर्माते होते. ज्युनिअर एनटीआरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.2 / 10साऊथचा सुपरस्टार ज्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांची रांग लागते. ज्युनिअर एनटीआर म्हणजेच नंदमुरी तारक रामा राव असं त्याचं नाव आहे. अभिनेत्याचा लग्नाचा खर्च म्हणजे केवळ साऊथमध्येच नाही तर देशात चर्चेचा विषय ठरला होता. काय आहे त्याची लव्हस्टोरी?3 / 10ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. वयाने ८ वर्ष लहान मुलीच्या तो प्रेमात पडला होता. मुलगी १८ वर्षांची असतानाच त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं. इतकंच नाही तर हे लग्न अतिशय ग्रँड झालं होतं. त्याच्या लग्नाचा खर्च ऐकला तर तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. सध्या सिनेमांचा जेवढा व्यवसाय होतो तेवढा तर त्याच्या लग्नाचा खर्च होता. 4 / 10२०११ साली ज्युनिअर एनटीआर लक्ष्मी प्रणतीसह लग्नबंधनात अडकला. लक्ष्मी प्रणती हैदराबादची आहे. तिचा जन्म १८ मार्च १९९२ रोजी झाला. लक्ष्मी प्रणती लग्नावेळी केवळ १८ वर्षांची होती तर ज्युनिअर एनटीआर २६ वर्षांचा होता. दोघांच्या वयात ८ वर्षांचं अंतर होतं. 5 / 10लक्ष्मी प्रणती प्रसिद्ध उद्योगपती नरणे श्रीनिवास यांची मुलगी आहे. त्यामुळे सासर आणि माहेर दोन्हीकडूनही ती चांगलीच रॉयल पद्धतीत वाढली आहे. लक्ष्मीच्या लग्नातील साडीची किंमत ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. 6 / 10लक्ष्मीने लग्नात तब्बल १ कोटीची साडी नेसली होती. पिवळ्या रंगाची ही कांजीवरम साडी सोन्या चांदीने विणली गेली होती. तर तिने सोनं आणि हिऱ्याचे दागिने परिधान केले होते. अगदी पारंपारिक पण रॉयल असा तिचा लुक होता.7 / 10तर दुसरीकडे ज्युनिअर एनटीआरने पारंपारिक पांढरा धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर गळ्यात एक भलोमोठा हार होता. गुलाबी रंगाचं उपरणं होतं. त्यांच्या लग्नाचा मंडपच १८ कोटींचा होता अशीही चर्चा आहे. जवळपास ३ हजार पाहुणे लग्नाला आले होते.8 / 10तर दुसरीकडे ज्युनिअर एनटीआरने पारंपारिक पांढरा धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर गळ्यात एक भलोमोठा हार होता. गुलाबी रंगाचं उपरणं होतं. त्यांच्या लग्नाचा मंडपच १८ कोटींचा होता अशीही चर्चा आहे. जवळपास ३ हजार पाहुणे लग्नाला आले होते.9 / 10आता एवढा सगळा खर्च पाहता ज्युनिअर एनटीआरच्या लग्नाचा एकूण खर्च १०० कोटींपर्यंत गेला होता. साऊथमधले तर हे सर्वात महागडे लग्न होते. हे देशातील सर्वात रॉयल लग्नांपैकी एक लग्न आहे. या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. 10 / 10ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी यांना दोन मुलं आहेत. अभय आणि भार्गव अशी त्यांची नावं आहेत. आजही त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. ज्युनिअर एनटीआर आजही बायकोच्या प्रेमात वेडा असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications