Join us

संसदेत ३ दिवस 'गदर २' चे स्पेशल स्क्रिनींग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 1:09 PM

1 / 11
सनी देओलचा गदर २ सिनेमा सध्या तुफान हीट झालाय. चित्रपटाने ४०० कोटींचा आकडा पार केला असून सिनेमागृहात अद्यापही चित्रपटाला गर्दी होत आहे.
2 / 11
गदर 2 (Gadar 2) च्या माध्यमातून सनी देओल (sunny deol) और अमीषा पटेल (ameesha patel) यांचे 22 वर्षांनी पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे.
3 / 11
या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बंपर कमाई केली असून अजूनही चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाल मोठे यश मिळत असून अनेक सेलिब्रिटींनीही त्याचे बरेच कौतुक केले आहे.
4 / 11
या चित्रपटासाठी आणखी एक खुशखबर आहे. नव्या संसदगृहात गदर 2 चे स्क्रीनिंग होणार असून यामुळे निर्मात्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच ही गुड न्यूज शेअर केली आहे.
5 / 11
या सिनेमाचे खासदारांसाठी स्पेशल स्क्रिनींग करण्यात येणार असून तेही संसदेत होत आहे. नव्या संसदेच्या, बालयोगी सभागृहात गदर 2 चे स्क्रिनींग होत आहे.
6 / 11
या विशेष प्रदर्शनाबाबत ईमेल मिळाल्याने एएसपी (अनिल शर्मा फिल्म्स) खूप खुश आहे. हे स्क्रीनिंग 25 ऑगस्ट सुरू झालं असून असून तीन दिवस म्हणजेच २७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
7 / 11
गदर-२’चे खेळ संसदेत आयोजित करण्यावरून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं. संसदेच्या नव्या भवनातील या स्क्रिनींगवरुन आता काँग्रेसने टीका केली आहे.
8 / 11
''नव्या भारतात राजकारणाचा देखावा केल्यानंतर आता स्वयंघोषित विश्वगुरू भारतीय लोकशाहीला चित्रपटगृहात बंदिस्त करू पाहत आहेत, तेही संसदेत''
9 / 11
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरुन ही टीका केलीय. या चित्रपटामध्ये भाजपचे खासदार प्रमुख भूमिकेत असून, त्यांना बँक ऑफ बडोदाचे ५६ कोटी रुपयांचे देणे फेडण्यात अपयश आल्याचा टोलाही रमेश यांनी लगावला.
10 / 11
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये स्पेशल स्क्रिनींग करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर राष्ट्रपती भवनकडून हे वृत्त नाकारण्यात आले.
11 / 11
दरम्यान, आता संसद सभागृहात स्क्रिनींग होत असून लोकसभा आणि नवीन संसदेत चित्रपट दाखवला जाण्याची ही पहिलीच व ऐतिहासिक घटना असल्याचं बोललं जातंय.
टॅग्स :सनी देओलभाजपाकाँग्रेससंसदसिनेमा