Join us

Sukesh Chandrashekhar : "मेरी बेबी, मेरे बोम्मा, मेरी कप केक..."; जेलमधून सुकेशने जॅकलिनसाठी लिहिलं 'लव्ह लेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 2:57 PM

1 / 10
तिहार जेलमध्ये असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरचं बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर खूप प्रेम आहे. सुकेश नेहमीच जॅकलिनला 'लव्ह लेटर' लिहून त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो.
2 / 10
सुकेशने पुन्हा एकदा ख्रिसमस आणि थँक्सगिव्हिंगच्या निमित्ताने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेशने पुरस्कार मिळाला म्हणून जॅकलिनचं अभिनंदन केलं आणि तिला My Love आणि 'बेबी' असं म्हटलं आहे.
3 / 10
सुकेशने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, 'बेबी, सर्वप्रथम, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे, एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीतील तुझ्या योगदानाबद्दल 7वा DIAFA पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.'
4 / 10
'माय लव्ह, तुझ्यासाठी मी किती आनंदी आहे याची तुला कल्पना नाही, तू खरोखरच बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील महान कलाकार आहेस. अवॉर्ड फंक्शनमध्ये तू व्हाईट गाऊनमध्ये सुपर सुपर स्टनिंग दिसत होतीस. बेबी, तुला पाहून मी पुन्हा एकदा चकीत झालो.'
5 / 10
'बेबी, तुझे दोन नवीन फोटोही पाहिले. एक वाळवंटात काढलेल्या रेड अरब ड्रेस मधला तुझा फोटो होता आणि दुसरा गुलाबी साडीतला फोटो होता जो खूपच सुंदर होता. पण ज्याने माझं मन जिंकलं ते फोटोशूट म्हणजे चमदार लेहेंग्यामधलं फोटोशूट आहे.'
6 / 10
'बेबी, तू या ग्रहावरील एकमेव लिविंग एंजेल आहेस, लेहेंगा आणि तू एकत्र खूप सुंदर आणि स्टनिंग दिसत होतीस. स्लीपनेस नाईट्स या फक्त तुझाच विचार करण्यासाठी आहेत. माझी हनी बी, तुझ्याबरोबर राहण्याची वाट पाहतोय.'
7 / 10
'बेबी, आनंदाचा आणि थँक्सगिव्हिंगचा महिना सुरू झाला आहे. मला तुझ्यासोबत तुझी आवडती टर्की ग्रील्ड आणि “Chateau Chavel Blanc, 1947 Wine” खाण्याची खूप आठवण येतेय... माझा केपकेक.'
8 / 10
सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये आहे. तो बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण जॅकलिनने रिलेशनशिपमध्ये नसल्याचं म्हटलं आहे.
9 / 10
10 / 10
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस