लेकीच्या लग्नात अण्णा सुनील शेट्टी भावूक, शेअर केले खास फोटो, अथिया राहुलच्या लग्नाचे Unseen Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:08 AM2023-01-26T11:08:55+5:302023-01-26T11:18:48+5:30

लेकीचं लग्न म्हणलं की बाप तर भावूक होणारच. सुनील शेट्टी, अथिया आणि भाऊ अहान शेट्टीचे काही भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद

अण्णा सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी नुकतीच लग्नबंधनात अडकली. भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल सोबत दिड वर्ष डेट केल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.

या न्युली वेड कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवविवाहित वधू अथिया गुलाबी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल १० हजार तास लागल्याची माहिती आहे.

लेकीचं लग्न म्हणलं की बापासाठी तो सर्वात मोठा भावूक क्षण असतो. सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी दोघेही भावूक झाल्याचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

नवजोडप्यावर फुलांचा वर्षाव करतानाचाही फोटो सुनील शेट्टीने शेअर केला आहे. यामध्ये अथिया आणि राहुल यांनी हात जोडले आहेत आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत आहेत. तर दोघांचेही आईवडील त्यांच्यावर कौतुकाने फुलांचा वर्षाव करत आहेत.

बहिणीच्या लग्नात तिचा भाऊ दाखवत नसला तरी तोही भालूक होतोच. अथियाचा भाऊ अहान शेट्टीनेही लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या लाडक्या बहिणीला तो मंडपात घेऊन येतानाचा तो खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तसेच एका फोटोत अहान दोघांकडेही कौतुकाने पाहत आहे. त्याच्या हातात पुजेचे ताट आहे. तो अथिया च्या पायाशी बसला आहे. माझे तुम्हा दोघांवरही खूप प्रेम आहे. तुमचे जीवन आनंदी राहो असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.

अथिया आणि राहुलचा हा शाहीविवाहसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. बॉलिवुड आणि क्रिकेटमधील काही दिग्गजांनी या लग्नसोहळ्यात उपस्थिती दर्शवत नवजोडप्याला आशिर्वाद दिले.

ज्या घराने आपल्याला खूप आनंद आणि चांगले क्षण दिले त्याच घरात आपण विवाहबद्ध झाल्याचा मला आनंद आहे असे कॅप्शन अथियाने लिहिले आहे.