Join us

Sunil Shetty's Love Story: कोण आहे सुनिल शेट्टीची पत्नी माना? इंटरकास्ट मॅरिज, एकेकाळी खूप चर्चेत होती अन्नाची लव्हस्टोरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 3:20 PM

1 / 11
आज क्रिकेटपटू के एल राहुल आणि बॉलिवूडची अभिनेत्री अथिया शेट्टीचा विवाह आहे. थोड्याच वेळात ते खंडाळ्याच्या सुनिल शेट्टीच्या फार्महाऊसवर सात फेरे घेतील. सध्या त्यांचा विवाह ट्रेंडिंगमध्ये आहे. परंतू, बॉलिवूडचा सुपरस्टार अन्ना म्हणजेच सुनिल शेट्टीची लव्हस्टोरी देखील एकेकाळी टॉपवर होती.
2 / 11
सुनिल शेट्टी आजकाल सिनेमांमध्ये दिसत नाही. परंतू याच सुनिल शेट्टीने एकेकाळी बॉलिवूडमध्ये गल्ला जमविला होता. ६१ वर्षीय सुनिल शेट्टीची अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत. सुनिल शेट्टी वर्षाला १०० कोटी रुपयांहून अधिकची कमाई करतो.
3 / 11
सुनिल शेट्टीची पत्नी देखील काही कमी नाही. ती देखील एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. तिचे नाव माना शेट्टी आहे. या दोघांची लव्ह स्टोरी काही सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीय. आज सुनिल शेट्टीचा वाढदिवस आहे. खुद्द सुनिल शेट्टीनेच सांगितलेले, की पहिल्याच टक्कर मध्ये ते प्रेमात पडलेले परंतू लग्नाला सहा वर्षे वाट पहावी लागली होती.
4 / 11
सुनील शेट्टी आणि मानाचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. दोघांना घरच्यांना समजवायला 6 वर्षे लागली. मानाचे वडील गुजराती मुस्लिम आणि आई पंजाबी होती. सुनील शेट्टी हा कर्नाटकातील तुळू भाषिक कुटुंबातील होता. यामुळे दोघांच्याही कुटुंबाचा त्यांच्या या नात्याला विरोध होता.
5 / 11
सुनिल आणि लग्नापूर्वीची मोनिशा कादरी हे एका पेस्ट्री शॉपमध्ये पहिल्यांदा भेटले होते. तेव्हाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुनिलने तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी तिच्या बहीणीशी मैत्री केली होती. मग मोनिशाशी संपर्क वाढविला होता.
6 / 11
सुनिलने एका कॉमन मित्राच्या आधारे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला मोनिशाला बोलावण्यात आले होते. याच पार्टीत सुनिलने मोनिशाला प्रपोज केले होते. यानंतर २५ डिसेंबर १९९१ ला त्यांनी लग्न केले.
7 / 11
सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी 'आर-हाऊस' नावाचे लाइफस्टाइल स्टोअर चालवते. सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू, प्रकाशयोजना आणि दररोजच्या लक्झरी वस्तूंची विक्री केली जाते. बड्या सेलिब्रिटींपासून ते व्हीआयपींपर्यंत आपल्या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी या स्टोअरमध्ये येतात.
8 / 11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्टोअरच्या महागड्या फर्निचरपैकी 80 टक्के भारतातून आणि उर्वरित जगाच्या विविध भागांतून आणल्या जातात.
9 / 11
माना शेट्टीने पती सुनील शेट्टीसोबत S2 नावाचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला ज्याअंतर्गत त्यांनी मुंबईत 21 लक्झरी व्हिला बांधले आहेत. या व्हिलामध्ये अनेक सेलिब्रिटी राहतात. यासोबतच अनेक बड्या उद्योगपतींनीही हे व्हिला विकत घेतले आहेत.
10 / 11
सुनील शेट्टीची पत्नी माना प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहे. ती तिची बहीण ईशासोबत 'माना अँड ईशा' नावाचा कपड्यांचा ब्रँडही चालवते. माना शेट्टीचे वडील आयएम कादरी हे प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत.
11 / 11
माना शेट्टी 'सेव्ह द चिल्ड्रन इंडिया' नावाच्या एनजीओशी संलग्न आहे. एनजीओसाठी निधी उभारण्यासाठी ती 'आरिश' नावाने वेळोवेळी प्रदर्शनेही भरवते. यातून मिळणारा पैसा मुली आणि महिलांच्या गरजांसाठी वापरला जातो.
टॅग्स :सुनील शेट्टीलोकेश राहुलअथिया शेट्टी