Join us  

अन् ३० वर्षांचं वैर 'गदर २'मुळे मैत्रीत बदललं? शाहरुखने सनी पाजीला केला फोन, म्हणाला-मी तुझ्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:59 PM

1 / 8
सनी देओलचा चित्रपट गदर 2 बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. हा चित्रपट सर्वकालीन ब्लॉकबस्टर म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.
2 / 8
प्रेक्षकांसोबतच सेलिब्रिटीही या चित्रपटाचे कौतुक करत आहे. तुमचा विश्वास नाही बसणार पण सनी पाजीचा सिनेमा पाहिल्यानंतर चक्क शाहरुख खानने फोन करून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
3 / 8
सनी आणि शाहरुखची मैत्री चाहत्यांसाठी थोडी शॉकिंग आहे. त्यामागचे कारण त्यांची जुनी ३० वर्ष जुनी दुश्मनी. जुने वैर विसरुन किंग खान आणि सनी पाजीला फोन केला होता. सनी देओलने नुकताच खुलासा केला की, शाहरुखने चित्रपट पाहिल्यानंतर त्याला फोन केला होता.
4 / 8
आता या दोघांमध्ये काय बोलणं झाले हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सनी पाजीने नुकतेच सांगितले की, केवळ शाहरुखच नाही तर तो त्याची पत्नी गौरी खानशीही देखील बोलला.
5 / 8
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत 'तारा सिंह'ने खुलासा केला की 'गदर 2' पाहण्यापूर्वी शाहरुख खानने त्याला फोन केला होता. शाहरुखची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन खान यांनीही त्याच्याशी फोनवर संवाद साधला. शाहरुखने सनीला गदर २ साठी शुभेच्छा दिल्या होत्या, असं तो म्हणाला.
6 / 8
सनीने सांगितले की, शाहरुख खान मला फोनवर मला, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि त्यासाठी मी त्याचे आभारही मानले. त्याने सांगितले की, तो आपल्या कुटुंबासह चित्रपट पाहणार आहे आणि हे ऐकून मी उत्तर दिले, ग्रेट. तो म्हणाला की, मला वाटते की त्याने चित्रपट पाहिला आणि नंतर ट्विट केले.
7 / 8
सनी शाहरुखसोबतच्या जुन्या वैराबाबत बोलताना म्हणाला, 'जुन्या जे काही मतभेद होते त्यावर मी ऐवढंच म्हणेन की वेळ सर्व जखमा भरून काढते. आपण पुढे जायला हवं.
8 / 8
दोघांमधील हे मतभेद 1993 मध्ये आलेल्या 'डर' चित्रपटानंतर सुरु झाले होते. चित्रपटात शाहरुखच्या भूमिकेला जास्त महत्त्व दिल्याने सनी देओलला खूप राग आला होता आणि त्यानंतर त्याने शाहरुखसोबत कोणताही चित्रपटात काम केलं नाही.
टॅग्स :सनी देओलशाहरुख खान