Join us

हार्ड ड्राइव्ह डिलीट केल्याच्या आरोपावर रिया चक्रवर्तीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली त्याच्या बहिणीला विचारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 2:41 PM

1 / 11
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सुसाइड केसमध्ये सीबीआय रिया चक्रवर्तीला कधी ताब्यात घेतील आणि तिची चौकशी करतील याची सगळेजण वाट बघत आहेत. पण त्याआधी 'आजतक'ला दिलेल्या मुलाखतीत रियाने तिच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
2 / 11
इतकेच नाही तर तिने सुशांतबाबतच्या अनेक नवीन गोष्टीही सांगितल्या आहेत. अशात सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने खुलासा केला होता की, रियाने हार्ड ड्राइव्ह डिलीट करून घेतली होती. या आरोपावर रियाने मुलाखतीत उत्तर दिलंय.
3 / 11
सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा हाऊसमेट होता. असा दावा केला जात आहे की, त्याने सीबीआयकडे माहिती दिली की, रियाने एका आयटी पर्सनला बोलवून हार्ड ड्राइव्हवरील सर्व डेटा डिलीट करून घेतला होता. सुशांतही तिथे उपस्थित होता. पण रियान तिच्यावर लावलेला हा आरोप फेटाळून लावला आहे.
4 / 11
रिया म्हणाली की, 'हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. अशी कोणतीही हार्ड ड्राइव्ह मला माहीत नाही आणि आठवत नाही. मी होते तोर्यंत कुणीही आलं नव्हतं. मी गेल्यानंतर त्याची बहीण ८ ते १३ जूनपर्यंत तिथे होती. तिलाच या सर्व गोष्टी माहीत असतील. माझ्या उपस्थिती असं काहीही झालं नाही.
5 / 11
मला नाही वाटत असं काही झालं असेल. मला वाटतं की, ही पुन्हा एक नवीन कहाणी रचली जात आहे. जशी रोज नवीन कहाणी रचली जाते. ज्यांना कोणताच आधार राहत नाही. असं असेल तर प्रश्न असा उपस्थित राहतोय की, खोटं कोण बोलतंय? सिद्धार्थ पिठानी की रिया?
6 / 11
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात तिने तिच्या एका चुकीबाबत सांगितले. ती म्हणाली की, तिने एक चूक केली होती. ती म्हणजे सुशांत सिंह राजपूतवर प्रेम केलं.
7 / 11
ती म्हणाली की, याने काहीही फरक पडत नाही की, कोणती एजन्सी तपास करत आहे आणि कोण चौकशी करत आहे. पण तिच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही.
8 / 11
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईडीकडून रियाची मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने विचारपूस करण्यात आली. रियाच्या काही व्हॉट्सअॅप चॅट्स जे ड्रग्सबाबत इशारा करत होते ते नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे सोपवण्यात आले आहेत. जेणेकरून या केसमधील ड्रग्स अॅंगलची चौकशी केली जावी.
9 / 11
एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. रिया विरोधात क्रिमिनल केस दाखल झाली आहे. ज्या लोकांची नावे ईडीच्या एफआयआरमध्ये होते त्यांच्या विरोधात एनसीबीने केस दाखल केली आहे. त्यात रियाच्या भावाचाही समावेश आहे.
10 / 11
आजतकसोबत बोलताना रिया चक्रवर्तीने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं.
11 / 11
रियाने सांगितले की, 'पॅरिसमध्ये माझं एक शूट होणार होतं. यासाठी इव्हेंट ऑर्गनाइज कंपनीकडून फ्लाइटची तिकीटे आणि हॉटेलचं बुकींग झालेलं होतं. पण ही सुशांतचीच आयडिया होती की, या निमित्ताने यूरोपची ट्रिप करूया. सुशांतने नंतर माझे तिकीट्स कॅन्सल केले आणि स्वत:च्या पैशाने फर्स्ट क्लासचं तिकीट बुक केलं होतं. मी त्याला म्हणाले होते की, तू फार जास्त पैसे खर्च करतोय'.
टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड