सुशांत सिंह राजपूत खरंच डिप्रेशनमध्ये होता का? हॅंडरायटींगमधून झाला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 9:51 AM1 / 10सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रूममध्ये सुसाइड नोट न मिळणं ही एक आश्चर्यकारक बाब होती. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत डायरी मेंटेन ठेवत होता आणि त्यात प्रत्येक बाब लिहित होता. अशात त्याने सुसाइड नोट न लिहिणं सर्वांनाच संशयास्पद वाटत आहे. 2 / 10सुशांतच्या घरात काही नोट्स सापडल्या होत्या. तर रियानेही सुशांतने लिहिलेली एक नोट शेअर केली होती. यात सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी बाब होती ती म्हणजे त्याची हॅंडरायटींग.3 / 10हॅंडरायटींग एक्सपर्ट आदर्श मिश्रा यांच्याकडे सुशांतने लिहिलेल्या एकूण १५ पानांच्या नोट्स होत्या. यातील काहींच्या हॅंडरायटींगचं त्यांनी विश्लेषण केलं. एक एक शब्द तपासल्यावर त्यांनी सुशांतबाबत खपू काही सांगितले.4 / 10एक्सपर्टनुसार, या नोट्समध्ये सुशांतने भविष्यबाबत बरीच प्लॅनिंग केली होती. त्याने प्यूचर प्लॅन तयार करून ठेवला होता. २०२० मध्ये काय करायचं आहे. भविष्य प्रोग्रेसिव्ह बनवायचं आहे. कोणते लोक महत्वाचे आहेत. कशा लोकांसोबत कनेक्शन बनवायचं आहे. कोणत्या लोकांकडून स्क्रीप्ट लिहून घ्यायची आहे. हे सगळं त्याने लिहून ठेवलं होतं. 5 / 10 सुशांतच्या हॅंडरायटींगची अलायनमेंट फार स्ट्रेट आहे. यातून असं समजतं की, त्याची लाइफ स्टाइफ साधी आणि स्ट्रेट फॉरवर्ड होती. तर अभिनेत्यावर लावण्यात आलेले डिप्रेशनचे दावे खोटे असल्याचे त्यांना दिसले.6 / 10एक्सपर्टनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्यांची हॅंडरायटींग थोडी डाउनवर्ड होते. पण सुशांतच्या नोटस्मध्ये असं काही नव्हतं. त्याची हॅंडरायटींग पाहून असं अजिबात वाटलं नाही की, तो डिप्रेशनमध्ये होता.7 / 10हॅडरायटींगने सुशांत डिप्रेशनमध्ये असण्याचा दावा खोटा ठरवला आहे. पण मेडिकल रिपोर्ट आणि रियाच्या जबाबानुसार, सुशांत डिप्रेशनमध्ये होता. सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या बहिणीने हे मान्य केलं होतं की, तिच्या भावाने गेल्या काही काळापासून डिप्रेशनची औषधं घेणं बंद केलं होतं.8 / 10तेच सुशांत सिंह राजपूतच्या केसबाबत सांगायचं तर सीबीआय पूर्णपणे अॅक्शनमध्ये आहे. घटनेच्या दिवशी सुशांतच्या घरात असलेल्या कुक नीरज, सिद्धार्थ पिठानी, केशव, दीपेश सावंत यांची चौकशी सुरू आहे.9 / 10शनिवारी घटनास्थळी क्राइम सीन री-क्रिएट करण्यात आला होता. जवळपास ६ तासांची चौकशी केल्यानंतर सीबीआयची फॉरेंसिक टीम सर्वच साक्षीदारांना घेऊन डीआरडीओ ऑफिसला गेली.10 / 10सुशांतच्या घराच्या छतावरही पाहणी करण्यात आली. शेजाऱ्यांचे जबाब घेतले गेले. यादरम्यान काही धक्कादायक गोष्टीही समोर आल्या. एका शेजारी महिलेने सांगितले की, ज्या रूमचे लाइट कधीच बंद होत नाही, घटनेच्या एक दिवसआधी लाइट बंद होती. आणखी वाचा Subscribe to Notifications