IN PICS : सुश्मिता सेननं 10 वर्षांचा ब्रेक का घेतला होता माहितीये? स्वत: सांगितलं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 4:58 PM1 / 8विश्वसुंदरीचा खिताब पटकावला आणि पाठोपाठ सुश्मिता सेनची सिनेमात एन्ट्री झाली. पण विश्वसुंदरी ते अभिनेत्री हा प्रवास सुश्मितासाठी सोपा नव्हता. 2 / 8सगळ्या अडचणींवर मात करत, सुश्मिता आघाडीची अभिनेत्री बनली. सिनेइंडस्ट्रीत तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.3 / 8 सुष्मिताने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले. पण त्यानंतर अचानक तिने तब्बल 10 वर्षांचा ब्रेक घेतला. ब्रेकनंतर ती परतली खरी पण चित्रपटांऐवजी तिने वेबसीरिज करण्याला प्राधान्य दिलं.4 / 8 चित्रपट समीक्षक सुचरिता त्यागी हिला दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता यावर बोलली. दहा वर्षांचा इतका मोठा ब्रेक घेण्यामागचं कारणही तिने सांगितलं.5 / 8कमबॅकसाठी चित्रपटांऐवजी वेबसीरीज का निवडली, या प्रश्नावर ती म्हणाली, ‘मी बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला मनासारखी भूमिका मिळाली नाही. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला.’6 / 8 तब्बल 10 वर्षांचा ब्रेक यावर ती म्हणाली, ‘10 वर्षांच्या ब्रेकनं मला खूप काही शिकवलं. माझ्या दोन मुली रेनी आणि अलिसा यांचे संगोपन करण्याला मी प्राधान्य दिलं. मला काय करायचंय, काय नाही, हे मला कळलं. मला जे हवं आहे, ते सिनेमा देत नव्हता.7 / 8‘माझी क्षमता आणि लोकांशी संपर्क नसल्याने मी अशा अनेक संधी गमावल्या. त्यावेळी माझी मानसिकता काय होती, हे मला माहित नाही. पण मी स्वत:ला या सर्व गोष्टींमधून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यात कधीच चांगले नव्हते. मी नेटवर्किंगमध्ये चांगली नाही, असंही ती म्हणाली.8 / 8सुश्मिता ही 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात शेवटची झळकली होती. त्यानतंर तिने 2020 मध्ये हॉटस्टारवरील ‘आर्या’ या वेबसीरिजद्वारे कमबॅक केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications