Join us

'स्वदेस'ची २० वर्ष पूर्ण! आशुतोष गोवारीकर यांनी शेअर केले शाहरुख खानसोबतचे कॅमेरामागील खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:59 IST

1 / 7
शाहरुख खानच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण सिनेमा म्हणजे 'स्वदेस'. या सिनेमाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली आहेत
2 / 7
'स्वदेस' सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आशुतोष गोवारीकर यांनी सिनेमासंबंधी खास BTS क्षण शेअर केलेत. या फोटोंमध्ये आशुतोष आणि शाहरुख एकत्र पाहायला मिळत आहेत
3 / 7
'स्वदेस' सिनेमात शाहरुखने मोहन भार्गव ही व्यक्तिरेखा साकारली होती. जो नासामध्ये काम करणारा असतो.
4 / 7
पुढे हाच मोहन त्याचा सांभाळ करणाऱ्या कावेरी अम्माला शोधायला भारतातील चरणपूर नावाच्या गावात येतो. तिथे आल्यावर त्याच्यात कसा बदल होतो याची कहाणी सिनेमात पाहायला मिळते.
5 / 7
हा सिनेमा भारतातील एका खऱ्या गावात शूट झाला आहे. शाहरुखने सिनेमात केलेला अभिनय सर्वांच्या हृदयाला भिडला
6 / 7
आशुतोष गोवारीकर यांंच्या कमाल दिग्दर्शनाने 'स्वदेस' सिनेमाला चार चाँद लागले. शाहरुखची भूमिका, त्याचा लूक पुढे अनेकांनी फॉलो केला
7 / 7
भारताबद्दलचं खरं प्रेम या सिनेमातून पाहायला मिळालं. सिनेमात शाहरुख खानसोबत गायत्री जोशी, किशोरी बल्लाळ या कलाकारांनी भूमिका साकारल्या.
टॅग्स :शाहरुख खानआशुतोष गोवारिकरबॉलिवूड