एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...! तापसी पन्नूचा शिफॉन साडीत 'हसीन दिलरुबा' लूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:37 PM1 / 7बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदा 'हसीन दिलरुबा' बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. ११ जानेवारीपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. 2 / 7सध्या तापसी तिच्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर आग लावत आहे, कधी लाल, कधी पिवळ्या तर कधी निळ्या भडक साडीत ती सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.3 / 7तापसीचा 'हसीन दिलरुबा' लूक सध्या चर्चेत आहे. नुकतेच तिने निळ्या साडीतील फोटो शेअर केलेत. शिफॉन साडीत तिने दाखवलेल्या अदा काही औरच आहेत.4 / 7 नयनरम्य बॅकग्राऊंड आणि तापसीचं सौंदर्य हे दृश्य मोहून टाकणारं आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळच केलं आहे.5 / 7तापसीच्या सौंदर्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे कुरळे केस. या केसात तिने गुलाबाचं फूल माळलं आहे आणि आपला लूक पूर्ण केला आहे. तसंच हातात लाल रंगाच्याच बांगड्या घातल्या आहेत. 6 / 7एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...असं कॅप्शन देत तिने निळ्या रंगाचं हार्ट इमोजी शेअर केलं आहे. या फोटोंमध्ये तिने खरोखरंच आपल्या सौंदर्यातून निळा रंग उधळला आहे.7 / 7याआधीही तापसीने लाल आणि पिवळ्या साडीतील काही फोटो शेअर केले होते. हे सगळं फोटोशूट तिने उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications