विवाहित नागार्जुनच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू...; या कारणामुळे संपलं नातं, अभिनेत्री आजही आहे सिंगल By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 10:12 AM1 / 9बॉलिवूड स्टार तब्बू आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करतेय. वयाची पन्नाशी कधीच ओलांडलेली तब्बू आजही अविवाहित आहेत. एकेकाळी याच तब्बूच्या व साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या प्रेमाच्या चर्चा जोरात होत्या.2 / 9तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं. संजय कपूर, साजिद नाडियाडवाला आणि नागार्जुन यांच्यासोबत तब्बूच्या अफेअरच्या चर्चा ब-याच रंगल्या. नागार्जुनसोबतचे तिच्या अफेअरची चर्चा तर प्रचंड रंगली.3 / 9म्हणतात की तब्बू व नागार्जुन दोघंही १० वर्षांपेक्षा अधिक काळ एकमेकांसोबत नात्यात होते. अर्थात दोघांचंही लग्न होऊ शकलं नाही. याचं कारण म्हणजे, नागार्जुन विवाहित होता.4 / 91992 या साली नागार्जुन व तब्बूच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांची पहिली भेट ‘शिशिंद्री’च्या सेटवर झाली होती. त्याकाळात दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आणि बघता बघता दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.5 / 9दोघांनी आपल्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होत आणि यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा आणखी जोरात सुरू होतं.6 / 9नागागर्जुन विवाहित होता. पण तब्बू त्यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून हैदराबादेत नागार्जुन राहायचा अगदी तिथेच घर घेतलं होतं.7 / 9याचकाळात नागार्जुन तब्बूसोबत तिसरं लग्न करणार असल्याची अफवाही पसरली होती. नागार्जुनची दुसरी पत्नी आमलाच्या कानावर या गोष्टी गेल्या आणि आपला संसार वाचवण्यासाठी तिने अखेर कंबर कसली.8 / 9याचदरम्यान अमलाने तब्बूला घरी आमंत्रित केलं. तब्बू नागार्जुनच्या घरी गेली, त्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. अमलाने तब्बू ही आमची फॅमिली फ्रेन्ड असल्याचं तेव्हा सांगितलं होतं.9 / 9असं म्हणतात की, तब्बूने अनेक वर्षे नागार्जुन यांची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट द्यायला राजी नव्हता. अखेर तब्बूने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्ये दोघंही कायमचे वेगळे झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications