Join us  

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 1:25 PM

1 / 8
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या विजय वर्माला डेट करत आहे. दोघांचं अफेअर बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय आहे. फोनमध्ये आमचे किमान ५ हजार फोटो असल्याचा खुलासा नुकताच विजय वर्माने केला होता.
2 / 8
तसंच विजय वर्माची तर लॉटरीच लागली अशाही अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तमन्नाने नुकतंच एका मुलाखतीत रिलेशनशिपमधील रेड फ्लॅग आणि हार्टब्रेकवर भाष्य केलं.
3 / 8
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये तमन्ना म्हणाली, 'कोणीही आपल्या पार्टनरला बदलण्याचा किंवा आपण आहोत तसंच बनवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. हे म्हणजे तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं होतं.'
4 / 8
तसंच नात्यात खोटं बोलणंही रेड फ्लॅग आहे. मी खोटं बोलणाऱ्या लोकांसोबत राहू शकत नाही. विशेषत: छोट्या छोट्या गोष्टीतही खोटं बोलणारे लोक मला आवडत नाहीत.'
5 / 8
ती पुढे म्हणाली, 'सुरुवातीला जेव्हा जास्तच गिफ्ट मिळायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. मी हे सगळं करु शकतो हे दाखवण्यासाठीच तो करत असल्याचं मला वाटायचं. यामुळे रिलेशनशिपमध्ये प्राईस टॅग लावला जातोय असंही वाटायचं.'
6 / 8
आधी मी रिलेशनशिपमध्ये खूप गिव्हिंग होते. समोरचा रिसिव्हिंग पोझिशन मध्ये आहे की नाही हे जाणून न घेताच मी सगळं द्यायचे. ही टॉक्झिक पॉझिटिव्हिटी होती. मी प्रामाणिक आणि खरी होते एक्सप्रेसिव्ह आणि केअरिंग होते.'
7 / 8
'मी पार्टनरला समजून घेणारी आहे. आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट वाईट वाटेल हे आपल्याला माहित असतं. त्यामुळे तसं काही न वागण्याचा मी प्रयत्न करते.'
8 / 8
पहिल्यांदा माझ्यासोबत कमी वयात असताना असं झालं जेव्हा मी पार्टनरसाठी सगळ्या गरजा आणि इच्छा सोडायला तयार होते. मला आणखी एक्स्पोअर करायचं होतं. दुसऱ्यांदा हार्टब्रेक झालं तेव्हा मला जाणीव झाली की तो माझ्या आयुष्यात आणखी प्रभाव टाकू शकणार नाही.'
टॅग्स :तमन्ना भाटियासेलिब्रिटीरिलेशनशिपबॉलिवूडTollywood