बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही; 'ही' अभिनेत्री आता एका गाण्यासाठी घेते १ कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:24 AM1 / 9अभिनेत्री तमन्ना भाटिया तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत खूप एक्टिव्ह आहे. आज ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केलं आहे. 2 / 9तमन्नाने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिलेला नसला तरी ती साऊथमधील अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग आहे. तमन्नाने श्रीमधून तेलुगु इंडस्ट्रीत आणि केडीतून तामिळ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. 3 / 9वियाबारी या चित्रपटातून ती फेमस झाली. बाहुबली आणि बाहुबली २ या बिग बजेट चित्रपटांमध्ये तमन्ना मुख्य भूमिकेत दिसली होती. तिने अवंतिकाची भूमिका साकारली होती. बाहुबली २ हा १००० कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट होता.4 / 9अभिनेत्रीच्या बॉलीवूड करिअरबद्दल बोलायचं झाले तर ते काही खास राहिलं नाही. अभिनेत्रीची तिच्या कामासाठी खूप प्रशंसा केली गेली, परंतु बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे पडले. 5 / 9तमन्ना हमशकल्स, हिम्मतवाला आणि एंटरटेनमेंट सारख्या चित्रपटात दिसली. तिने अद्याप बॉलिवूडला एकही हिट चित्रपट दिलेला नाही. सध्या अभिनेत्रीच्या एका आयटम नंबरची खूप चर्चा आहे. 6 / 9तमन्नाने स्त्री २ चित्रपटातील 'आज की रात' हे गाणे केले आहे, जे चार्टबीटवर अव्वल आहे. याशिवाय तमन्ना लस्ट स्टोरीजमध्येही दिसली होती. या मालिकेत ती विजय वर्मासोबत दिसली होती. 7 / 9विजयसोबतची तिची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. पर्सनल लाईफमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत.8 / 9नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर तमन्ना गाण्यासाठी १ कोटी रुपये आणि चित्रपटांसाठी ३ कोटी रुपये फी घेते असे रिपोर्ट्स आहेत. डीएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये आहे.9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications