Tamannaah Bhatia : "आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया? By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:22 AM1 / 10अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 2 / 10'स्त्री 2' मधील तमन्ना भाटियाचं 'आज की रात' हे गाणं सध्या धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.3 / 10अभिनेत्रीने अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.4 / 10तमन्ना म्हणाली की, 'मला आई होण्याची, मुलं होण्याची भीती वाटते. मी एखाद्याला इतकं प्रेम आणि इतकी काळजी कशी देऊ शकते असा विचार मनात येतो.'5 / 10'माझ्या आई-वडिलांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने वाढवलं आहे की, त्यांनी यामध्ये पदवी घेतल्यासारखं वाटतं.'6 / 10'म्हणूनच मला आता मुलं होण्याची खूप भीती वाटते. मी ही लेव्हल कशी गाठू शकेन, वाढवू शकेन असा प्रश्न नेहमीच मला पडतो.'7 / 10तमन्नाने आपल्या मनातील भावना आता व्यक्त केल्या आहेत. मात्र लग्नानंतर तिचा आई होण्याचा निर्णय बदलतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.8 / 10अभिनेत्री सध्या अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. दोघांनीही आपलं रिलेशन पब्लिक केलं आहे. त्यांच्या रिलेशनची नेहमीच जोरदार चर्चा रंगते. 9 / 10तमन्ना भाटिया सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या अदांनी ती सर्वांनाच घायाळ करते.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications