Terence Lewis : "मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:49 IST
1 / 10टेरेन्स लुईस हा एक उत्कृष्ट डान्सर आहे. तो ५० वर्षांचा असून अजूनही सिंगल आहे. सायंतनी घोषसोबत त्याच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती.. 2 / 10टेरेन्सने ईटाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्याने तो सिंगल असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तसेच त्याला लग्न करायचं नाही आणि तो लग्नासाठी तयार देखील नसल्याचं म्हटलं आहे. 3 / 10'मी आधी कोणाला तरी डेट करत होतो पण आता मी सिंगल आहे आणि यातच खूप खूश आहे. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत.'4 / 10'एक कलाकार असल्याने मला थोडी स्पेस हवी आहे. मी असा व्यक्ती आहे, ज्याला १२ तासांनंतर कोणाचाच चेहरा पाहायचा नसतो.'5 / 10'मला घरी जायचं असतं. स्वत:वर जास्त लक्ष केंद्रीत करायचं आहे. यातच मी खूप जास्त आनंदी आहे.' 6 / 10'मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही कारण मी याआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे.'7 / 10'खूश राहण्यासाठी लग्न करण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही.' 8 / 10'मला असं कोणीच आयुष्यात नको जे माझ्या आनंदाचं कारण बनेल' असं टेरेन्स लुईसने म्हटलं आहे. 9 / 10टेरेन्स सायंतनी घोषच्या आधी तो दुसऱ्या कोणासोबत तरी दहा वर्षे लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं सांगितलं. 10 / 10टेरेन्स लुईस हा लोकप्रिय कोरियोग्राफर असून सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असतो. त्याचे असंख्य चाहते आहेत.