'अशुभ' म्हणत या अभिनेत्रीला १२ सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता, तरीदेखील मानली नाही तिने हार By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 1:37 PM1 / 8बॉलिवूड असो किंवा साउथ सिनेइंडस्ट्री, एकदा एखाद्या कलाकाराच्या करिअरला कलाटणी मिळाली ते गगनाला गवसणी घालू शकते. त्याचप्रमाणे एखाद्या कलाकाराचे वाईट दिवस सुरू झाले असतील तर त्याला सर्व प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात. असेच काहीसे एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घडले आहे. जेव्हा तिचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले, तेव्हा लोक तिला 'अशुभ' म्हणू लागले आणि तिच्या हातून एकामागून एक १२ चित्रपट निसटून गेले.2 / 8ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून विद्या बालन आहे, जिने 'भूल भुलैया'मध्ये 'मंजुलिका'ची भूमिका करून सर्वांना थक्क केले होते. विद्या एके काळी साऊथ चित्रपटांचा चेहरा होती, पण जेव्हा साऊथ इंडस्ट्रीने तिला नाकारले तेव्हा ती बॉलिवूडकडे वळली. 3 / 8नकारानंतर तिने साऊथ इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय कसा घेतला याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केलाय.4 / 8इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, 'लोकांनी मला दुर्दैवी किंवा अशुभ म्हटले. यामुळे मी कोलमडून गेले. त्यावेळी मला खूप राग होता. त्यामुळे या दोन चित्रपटांदरम्यान इतर अनेकांनी मला साईन केले होते आणि मला न सांगता माझी जागा दुसऱ्यांना द्यायला सुरुवात केली होती. जवळपास डझनभर चित्रपट आले ज्यात मला रिप्लेस केले होते.5 / 8साउथ सिनेसृष्टीत नाकारल्यानंतर विद्या बालनने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 'परिणीता' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 6 / 8पण तिला खरी ओळख मिळाली जेव्हा थिने नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मीसोबत 'द डर्टी पिक्चर' चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अभिनेत्रीने यानंतर अनेक चित्रपट केले आणि अजूनही ती इंडस्ट्रीत सक्रिय आहे.7 / 8आज विद्या बालनला ना ओळखीची गरज आहे ना तिच्याकडे संपत्तीची कमतरता आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री १३६ कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीची मालक आहे. तिचा स्वत:चा आलिशान बंगला आणि आलिशान गाड्याही आहेत.8 / 8विद्या बालन भुलभुलैया ३मध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications