Join us  

'हे बेबी'मधील क्युट एंजेलचा १७ वर्षांनंतर बदलला लूक, आता दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 7:21 PM

1 / 6
२००७ साली रिलीज झालेला अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान अभिनीत हे बेबी चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाने रसिकांना खळखळून हसविले तर काही ठिकाणी भावुकही केलं.
2 / 6
साजिद खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट अमेरिकन सिनेमा थ्री मेन अँड ए बेबीवर आधारीत होता आणि हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या तीन अभिनेत्यांव्यतिरिक्त यात एक क्युट मुलगीदेखील होती. जी खूप चर्चेत आली होती.
3 / 6
'हे बेबी'मधील क्युट एंजेलची भूमिका जुआना सांघवीने साकारली होती. आता चित्रपटाच्या १७ वर्षांनंतर जुआनाचा फोटो इंटरनेटवर पाहायला मिळत आहे.
4 / 6
क्युट जुआनाने चित्रपटातून बेबीने फक्त प्रेक्षकांचेच मन जिंकले नाही तर चित्रपटातील कलाकारांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
5 / 6
जानेवारी २०२२ मध्ये फरदीन खाने हे बेबीमधला बीटीएस फोटो शेअर केले होते. त्यावेळी ट्विटमध्ये लिहिले होते की, छोटी जुआनासोबत सीन करण्यासाठी त्याला स्मोकिंग सोडावा लागला होते. सिनेमा रिलीज झाल्यानंतर जुआनाच्या क्युटनेसवर प्रेक्षकांसोबत समीक्षकदेखील फिदा झाले होते.
6 / 6
बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की, चित्रपटातील तीन स्टार्सपेक्षा एंजेलचं सर्वात जास्त चर्चेत आली होती. नुकतेच जुआनाच्या बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते. आता २० वर्षांच्या जुआनाला या फोटोमध्ये ओळखणे कठीण जात आहे. जुआनाचे फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला बॉलिवूडमध्ये काम करताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
टॅग्स :रितेश देशमुखअक्षय कुमारफरदीन खान