The Kapil Sharma Show: '... म्हणून मी कपिलचा शो सोडला, आमचं भांडण नव्हतं' By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 4:27 PM1 / 9कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान काही वाद झाला, तेथूनच अनेक कलाकारांनी हा शो सोडला. 2 / 9त्यामध्ये, अली अजगर, सुनिल ग्रोव्हर आणि कपिलच्या आत्याची भूमिका निभावणाऱ्या उपासना सिंहनेही कपिलच्या शोला रामराम केला होता. त्यानंतर, कपिलने पुन्हा नव्या दमाने हा द कपिल शर्मा शो... या नावाने हा कॉमेडी शो सुरू केला. 3 / 9मात्र, कपिलसोबत भांडण झाल्यानेच उपासना सिंहने हा शो सोडल्याची चर्चा होती. आता, याबाबत स्वत: उपासना सिंहने स्पष्टीकरण दिलं आहे. 4 / 9कपिलसोबत आजही माझं नातं अतिशय चांगलं आहे. द कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो मी सोडला. मात्र, कपिलसोबत वाद झाल्यामुळे मी तो शो सोडला नसून कपिलने चॅनेल बदलल्यानेच मी ह्या शोमधून बाहेर पडले. 5 / 9कारण, अगोदर कपिलचा शो कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होत होता. मात्र, काही दिवसांच्या गॅपनंतर कपिलने ह शो सोनी टिव्हीसोबत करार करून तेथे सुरू केला. वास्तविक माझे कलर्स टीव्हीसोबत काही करार होते. 6 / 9त्यामुळे, मला कलर्स टीव्हीसोबत काम करावे लागले. त्यातूनच, मी कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये काम करू शकले नाही, असे उपासना सिंह यांनी सांगितले. 7 / 9आपण कपिल शर्मासोबत काम करायला तयार आहोत, पण त्यासाठी एखादं चांगलं कॅरेक्टर मिळायला हवं. 8 / 9कपिलसोबत मी काही भाग केले, पण काही मिनिटांसाठी त्याच्या शोचा भाग बनण्यापेक्षा क्रिएटीव्ह रोलने काहीतरी आनंदी काम करावं, याची मला जाणीव झाल्याचं उपासना सिंह यांनी म्हटलं. 9 / 9कपिलच्या शोमध्ये उपासना सिंह यांचं कॅरेक्टर हे बुआ नावाने प्रसिद्ध झालं होतं, या बुआला लोकांची चांगली पसंती मिळत होती आणखी वाचा Subscribe to Notifications