निर्मात्याने 'कुंडली' पाहून अभिनेत्रीला केलं होतं रिजेक्ट, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 2:27 PM1 / 8विद्या बालन सध्या आगामी चित्रपट 'दो और दो प्यार'मुळे चर्चेत आहे. यात ती प्रतिक गांधीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिलला भेटीला येणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या स्ट्रगल काळातील कटू आठवणींना उजाळा दिला. अनेक चित्रपटांमध्ये ती अशुभ असल्याचे सांगत तिला कसे बाहेर काढले याबद्दल तिने सांगितले.2 / 8विद्या बालनने अलीकडेच एक्सप्रेसोशी संवाद साधला. यादरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की तिला ३ वर्षे नकाराचा सामना कसा करावा लागला ज्यामुळे ती पूर्णपणे तुटली होती. 3 / 8विद्या म्हणाली की, माझ्या पोटातील खदखदीने मला हार मानू दिली नाही. मी रोज रात्री रडायचे आणि म्हणायचे की मी हार मानत असताना ही माझ्यासाठी शेवटची रात्र आहे. सकाळी पुन्हा उठायचे. मी खूप प्रार्थना करते, यामुळे मला खूप शक्ती मिळते.4 / 8विद्या म्हणाली की, मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या हे तर मी विसरून गेले आहे. मोहनलाल यांच्यासोबतचा चित्रपट बंद झाल्यानंतर एक मल्याळम चित्रपट आला. जो मी करणार होती. त्याचे पण काम थांबले. त्यानंतर मला लोक अशुभ म्हणू लागले, जे खूप हृदयद्रावक होते.5 / 8अपशकुनीच्या टॅगमुळे निर्मात्यांनी मला चित्रपटातून रिप्लेस करायला सुरुवात केली. विद्याने सांगितले की, तिला डझनभर चित्रपटांमधून बाहेर फेकण्यात आले. यादरम्यानचा एक प्रसंगही अभिनेत्रीने शेअर केला आहे.6 / 8विद्याने सांगितले की, एकदा ती एका तमिळ चित्रपटासाठी शूटिंग करत होती. त्यानंतर त्या चित्रपटाच्या निर्मात्याने तिला भेटण्यास नकार दिला. काही काळानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे समजले. निर्माता म्हणाला की, मी त्याची कुंडली पाहिली आहे, ती अशुभ आहे. 7 / 8विद्याने पुढे सांगितले की, हे ऐकून माझे आई-वडील चेन्नईमध्ये त्या निर्मात्याला भेटायला गेले होते आणि त्याला जाब विचारला होता, तेव्हा निर्मात्याने विचारले होते की ती हिरोईनसारखी दिसते का? त्या कमेंटचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी ६ महिने स्वतःला आरशात बघितले नाही, असे अभिनेत्रीने सांगितले. 8 / 8पण नशीब बदलले आणि त्याच निर्मात्याने तिला एका मोठ्या चित्रपटासाठी संपर्क केला. विद्या बालन 'द डर्टी पिक्चर', 'लगे रहो मुन्ना भाई', 'भूल भलैया' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications