Join us

‘’माझ्या कुंडलीत दोन लग्नांचा योग…’’, बऱ्याच वर्षांपूर्वी गोविंदाने दिले होते दुसऱ्या लग्नाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 20:37 IST

1 / 7
प्रख्यात बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांच्या नात्यामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच दोघांचंही नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. गोविंदा आणि सुनिता हे वेगळे होणार असून, त्यासाठी गोविंदाची एका मराठी अभिनेत्रीशी असलेली जवळीक कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.
2 / 7
दरम्यान, गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गोविंदाची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. त्या मुलाखतीमध्ये गोविंदाने दोन लग्नांबाबत दावा केला होता. तसेच सुनिता आहुजासोबतच नीलमबाबतही आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या.
3 / 7
गोविंदाने त्या मुलाखतीत सांगितले होते की, सुनितासोबतच्या नात्यामध्ये मी गंभीरपणे गुंतू इच्छित नव्हतो. तर मला मौजमजा करण्यासाठी फिरण्यासाठी एका मुलीची सोबत हवी होती. हे अशासाठी की, मी चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन करताना कम्फर्टेबल होऊ शकत नव्हतो. तेव्हा भाऊ कीर्ती याने मला रियल लाईफमध्ये रोमान्स केलास तर रील लाईफमध्येही व्यवस्थितपणे रोमान्स करता येईल, असं सांगितले. तेव्हा सुनिता हिच्यासोबत माझ्या भेटीगाठी वाढू लागल्या.
4 / 7
याच मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले की, सुनितासोबत अफेअर सुरू असतानाच माझी नजर नीलम हिच्यावर पडली. तसेच मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिला पाहतच राहिलो.
5 / 7
त्याचदरम्यान, गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यामध्ये मिठाचा खडा पडला होता. तेव्हा गोविंदा सुनिता हिला नीलमप्रमाणे बवनण्यास सांगायचा. एकेदिवसी सुनिता नीलमबाबत काहीतरी बोलली. त्यामुळे गोविंदाला खूप राग आला आणि त्याने सुनितासोबतचं नातं तोडलं.
6 / 7
त्यानंतर गोविंदाने पुढे सांगितले की, जेव्हा मी नीलमशी बोलताना लग्नाचा विषय काढायतो, तेव्हा ती हा विषय टाळायची. ती वरच्या वर्गातील होती. हे लग्न यशस्वी ठरणार नाही याची जाणीव नीलमला होती. दुसरीकडे गोविंदाने सुनितासोबत मंदिरात लग्न केलं होतं. मात्र ही बाब सार्वजनिक केली नव्हती. याबाबत त्याने नीलमलाही अंधारात ठेवले होते. गोविंदाने नीलमवरील आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलं होतं. तसेच आपण तिची नेहमी काळजी घेऊ असे तो सांगायचा.
7 / 7
याच मुलाखतीमध्ये गोविंदाने दोन लग्नांबाबतही उल्लेख केला होता. तो म्हणाला होता की, पुढे कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी मुलीमध्ये गुंतून जाईन. त्या मुलीसोबत लग्न करेन. सुनिताने या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे. तेव्हा ती फ्री राहू शकेल. मी नशिबावर खूप विश्वास ठेवतो. माझ्या कुंडलीमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग आहे.
टॅग्स :गोविंदापरिवाररिलेशनशिप