सुशांतच्या कुटुंबाला अंकिताचा ‘आधार’, या 7 पोस्टने चाहत्यांनाही दिली हिंमत By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 5:21 PM1 / 8सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. अशात त्याच्या कुटुंबाची अवस्था काय असेल, याची कल्पना आपण करू शकतो. अशास्थितीत सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुशांतचे कुटुंब व चाहत्यांसोबत भक्कमपणे उभी आहे. तिच्या पोस्टवरून हेच दिसते. 2 / 8सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिताने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने ‘गॉड्स चाइल्ड’असे कॅप्शन दिले होते.3 / 8यानंतर अंकिताने घरातील देवघरात मेणबत्ती पेटवून #Candle4SSR मोहिमेत भाग घेतला होता. तू जिथे असशील तिथे हसत राहा, असे तिने या पोस्टसोबत लिहिले होते.4 / 8सुशांतच्या निधनानंतर त्याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ रिलीज झाला होता. हा सिनेमा पाहून अंकिता भावूक झाली होती. पवित्र रिश्ता ते दिल बेचारा असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले होते.5 / 8सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केली होती. यानंतर ‘सत्य जिंकणार’ अशा आशयाची चौथी पोस्ट तिने शेअर केली होती.6 / 8सुशांतप्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर अंकिताने पाचवी पोस्ट केली होती. ‘ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आला,’ असे तिने लिहिले होते.7 / 8अंकिताची सहावी पोस्टही सुशांतशी संबंधित होती. मला कुठल्याही स्थितीत खरेदी करता वा विकता येणार नाही, अशा आशयाची ही पोस्ट होती.8 / 8सातव्या पोस्टमध्ये तिने सुशांतच्या आईचा फोटो शेअर केला होता. आशा करते तू आईसोबत असशील, असे सुशांतसाठी तिने लिहिले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications