शाहिद कपूरपासून ते दीपिका पादुकोणपर्यंत, 'या' स्टार्सनी सिनेमासाठी घेतलं नाही मानधन By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 2:12 PM1 / 10कधी कधी आपले सिनेमे वाचवण्यासाठी अभिनेत्यांना समोर यावं लागतं. कधी कधी तर एखाद्या सिनेमात काम करण्यासंबंधी अभिनेत्याची इतकी इच्छा असते की, त्यांना कोणत्याही स्थितीत त्या सिनेमाचा भाग व्हायचं असतं. त्यासाठी ते मानधन म्हणून केवळ १ रूपयाही घेतात.2 / 10आपला सिनेमा 'जर्सी' थिएटरला रिलीज करण्यासाठी शाहिद कपूरने त्याचं मानधन कमी केलंय. त्याच्या या पावलाचं कौतुक केलं जात आहे. पण असं होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही काही कलाकारांनी सिनेमासाठी मानधन न घेता त्यात काम केलं. 3 / 10अभिनेत्री सोनम कपूरने 'भाग मिल्खा भाग' सिनेमातील भूमिकेसाठी केवळ ११ रूपये घेतले होते. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी The Stranger in the Mirror मध्ये याचा उल्लेख केला आहे.4 / 10फराह खानने दिग्दर्शित केलेला 'ओम शांति ओम' सिनेमाने इंडसस्ट्रीला दीपिका पादुकोणसारखी अभिनेत्री दिली. पण अनेकांना माहीत नाही की, दीपिकाने हा सिनेमा फ्रीमध्ये केला होता.5 / 10सलमान खान हा सुपरस्टार आहे. त्यामुळे अनेक सिनेमात तो पाहुणा कलाकार म्हणूनही दिसतो. तीस मार खान, अजब प्रेम की गजब कहाणी, ओम शांति ओम आणि सन ऑफ सरदार सिनेमातील कॅमिओसाठी सलमानने एक रूपयाही घेतला नाही.6 / 10राजकुमार रावने 'ट्रॅप्ड' सिनेमा फ्रीमध्ये केला होता. राजकुमार रावने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, काही सिनेमे हे पैशांपेक्षा मोठे असतात.7 / 10इरफान खानने अनेक भूमिकांमधून हे सिद्ध केलं आहे की, तो इंडस्ट्रीतील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'रोड टू लडाख' या शॉर्टफिल्ममध्ये काम करताना इरफानला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शक अश्विन म्हणाला होता की, त्याच्याकडे इरफानला देण्यासाठी पैसे नव्हते. तरीही इरफान त्याला सपोर्ट करण्यासाठी तयार झाला. 8 / 10विशाल भारद्वाजचा सिनेमा 'हैदर'च्या प्रॉडक्शनचा खर्च कव्हर करण्यासाठी शाहिद कपूरने हा सिनेमा फ्रीमध्ये केला होता. हा सिनेमा शाहिदच्या सर्वात चांगल्या सिनेमांपैकी एक आहे.9 / 10मीना कुमारी यांनी त्यांचा शेवटचा सिनेमा 'पाकीजा' करण्यासाठी एकही रूपया घेतला नव्हता. मीना कुमारी यांचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता. या सिनेमाची चर्चा आजही जगभरात होते10 / 10प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटोची भूमिका साकारण्यासाठी नंदीता दासच्या मंटो सिनेमासाठी त्याने एक रूपया घेतला होता. या त्याने कमाल भूमिका केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications