Join us  

अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 12:39 PM

1 / 10
तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' लवकरच रिलीजसाठी सज्ज आहे. नव्वदच्या दशकातील मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित या चित्रपटाद्वारे, त्या काळातील एक अभिनेत्री पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तिने संजय दत्त, अनिल कपूर, नाना पाटेकर यांसारख्या स्टार्ससोबत काम केले.
2 / 10
२००४ मध्ये, इमरान हाश्मीसोबत अभिनेत्रीचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, जो त्या काळातील सर्वात बोल्ड चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा रंगली होती. हा चित्रपट होता ‘मर्डर’. यामध्ये मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीने पडद्यावर खळबळ उडवून दिली होती.
3 / 10
मल्लिका शेरावत चित्रपटांमधील तिच्या बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध होती. पडद्यावर एकामागून एक बोल्ड सीन्स देऊन तिने इंडस्ट्रीत स्वत:साठी एक वेगळे स्थान निर्माण केले.
4 / 10
बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर असलेली मल्लिका शेरावत राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटातून पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
5 / 10
अभिनेत्रीच्या पुनरागमनापूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचवर आपली व्यथा मांडताना दिसत आहे. मल्लिका शेरावतने सांगितले की बॉलिवूडचे 'मोठे हिरो' तिच्याशी कसे गैरवर्तन करायचे.
6 / 10
व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री असे म्हणताना दिसत आहे की, चित्रपटातील नायक तिला रात्री भेटायला बोलवत असत. रात्री भेटायला का यायचं, असं विचारल्यावर तिला उत्तर मिळालं की, तुम्ही पडद्यावर अशा बोल्ड भूमिका करू शकता, मग रात्री भेटायला काय हरकत आहे.
7 / 10
मल्लिका शेरावतने सांगितले की, कलाकारांना वाटायचे की जर ती पडद्यावर बोल्ड असेल तर ती खऱ्या आयुष्यातही तडजोड करेल. तिच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्यांशी तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे तिला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. तिला बॉलिवूडमधून बाजूला करण्यात आले आणि तिला काम मिळणे बंद झाले.
8 / 10
बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर मल्लिका शेरावत हॉलिवूड चित्रपटांकडे वळली. तिने अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्येही काम केले आहे.
9 / 10
अभिनेत्रीच्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने 'मर्डर', 'डर्टी पॉलिटिक्स', 'हिस', 'ख्वाहिश' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
10 / 10
मल्लिका शेरावतने अक्षय कुमार, कतरिना कैफचा 'वेलकम' आणि संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्यासोबत 'डबल धमाल' या चित्रपटातही काम केले आहे. आता ती पुन्हा एकदा बॉलिवूडवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
टॅग्स :मल्लिका शेरावत